तब्बल 20 वर्षांनंतर अशोक आणि निवेदिता सराफ पुन्हा एकत्र झळकणार, नवा प्रोजेक्ट चर्चेत

Ashok Saraf Nivedita Saraf : तब्बल 20 वर्षांनी अशोक आणि निवेदिता सराफ पुन्हा एकत्र दिसणार आहेत.  

Intern | Updated: Nov 4, 2025, 04:04 PM IST
तब्बल 20 वर्षांनंतर अशोक आणि निवेदिता सराफ पुन्हा एकत्र झळकणार, नवा प्रोजेक्ट चर्चेत

मराठी मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कलाकारांमध्ये गणले जाणारे अशोक सराफ हे नाव प्रेक्षकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवत आहे. पन्नासहून अधिक वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य गाजलेले चित्रपट आणि मालिका केल्या आहेत. सध्या ते कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मामा’ या मालिकेत झळकत असून, त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळते आहे.

Add Zee News as a Preferred Source

अशोक सराफ यांची पत्नी आणि मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ ह्याही तितक्याच गुणी कलाकार आहेत. त्यांनीही अनेक सिनेमे आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोघांची जोडी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय ऑनस्क्रीन जोड्यांपैकी एक होती. ‘धुमधडाका’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘चंगू मंगू’, आणि ‘नवरी मिळे नवऱ्याला’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधील त्यांच्या जोडीला आजही चाहते विसरू शकलेले नाहीत.

आता तब्बल 20 वर्षांनंतर ही लाडकी जोडी पुन्हा एकत्र दिसणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर नुकतेच एक रहस्यमय पोस्टर शेअर करण्यात आले, ज्यावरून चाहत्यांनी लगेचच ही जोडी ओळखली. सध्या अशोक सराफ ‘अशोक मामा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत आणि लवकरच या मालिकेत निवेदिता सराफही प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या खास पुनरागमनामुळे मालिकेचा टीआरपी वाढेल, अशी निर्माते-दिग्दर्शक केदार शिंदे यांची रणनीती असल्याचे समजते. चाहत्यांसाठी ही निश्चितच एक आनंदाची बातमी आहे, कारण सराफ दांपत्याला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. निवेदिता सराफ यांना शेवटचं ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत पाहायला मिळालं होतं. तसेच त्यांनी ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतही मुख्य भूमिका साकारली होती. आता त्यांच्या आणि अशोक सराफ यांच्या पुनरागमनाने मराठी मालिकांच्या दुनियेत पुन्हा एकदा जादू निर्माण होणार, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.

FAQ
अशोक आणि निवेदिता सराफ पुन्हा एकत्र कधी दिसणार आहेत?
कलर्स मराठीवरील ‘अशोक मामा’ या मालिकेत निवेदिता सराफ लवकरच एण्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे ही जोडी पुन्हा एकत्र दिसू शकते.

या दोघांनी आधी कोणत्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे?
अशोक आणि निवेदिता सराफ यांनी ‘धुमधडाका’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘चंगू मंगू’ आणि ‘नवरी मिळे नवऱ्याला’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

निवेदिता सराफ शेवटच्या कोणत्या मालिकेत दिसल्या होत्या?
निवेदिता सराफ शेवटच्या स्टार प्रवाहवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत दिसल्या होत्या.

About the Author