झी २४ तासच्या 'फक्त लढ म्हणा' मोहिमेला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा पाठिंबा, दोन मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची घेतली जबाबदारी

झी २४ तासने पूरग्रस्तांसाठी सुरू केलेल्या ‘फक्त लढ म्हणा’ या उपक्रमाला राज्यभरातून दानशूर व्यक्तींचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.  

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 7, 2025, 06:17 PM IST
झी २४ तासच्या 'फक्त लढ म्हणा' मोहिमेला अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा पाठिंबा, दोन मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची घेतली जबाबदारी

झी २४ तास या वृत्तवाहिनीने नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत पुन्हा एकदा लोकांच्या मनात आशेचा किरण निर्माण केला आहे. पूरग्रस्तांसाठी सुरू केलेल्या ‘फक्त लढ म्हणा’ या उपक्रमाला राज्यभरातून दानशूर व्यक्तींचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

Add Zee News as a Preferred Source

या उपक्रमाचं उद्दिष्ट म्हणजे पूरग्रस्तांना केवळ आर्थिक मदत नव्हे तर त्यांच्या आयुष्याला पुन्हा उभं करण्यासाठी आवश्यक आधार देणं आहे. याच ध्येयाने झी 24 तासने ही मोहीम राबवली असून त्याला समाजातील विविध क्षेत्रांमधील लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतो आहे.

 'झी 24 तास मराठी सन्मान सोहळा 2025' 

मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गजांना मानाचा मुजरा आणि ताऱ्यांचा गौरव करणारा 'झी 24 तास मराठी सन्मान सोहळा 2025' आपली लाडकी वाहिनी झी 24 तासच्या वतीनं मायानगरी मुंबईमध्ये पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टी आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याची शान वाढवली. 

यावेळी झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी सुरु केलेल्या 'फक्त लढ म्हणा' या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत पूरग्रस्त भागातील मुलांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी मराठी इंडस्ट्रीमधील कलाकारांना आवाहन केले होते. त्यानंतर काही वेळातच या सोहळ्यामध्ये उपस्थित असणाऱ्या कलाकारांनी पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी पुढे आले.    

5 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली

नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल गेटेंनी या मोहिमेत सहभागी होत एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. त्यांनी पूरग्रस्त भागातील पाच विद्यार्थ्यांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. या कृतीमुळे केवळ त्या मुलींचं भविष्य उज्ज्वल होणार नाही तर समाजातील इतरांनाही मदतीची प्रेरणा मिळणार आहे.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचं सामाजिक योगदान

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीदेखील या उपक्रमात सहभाग घेत दोन मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. त्यांच्या या कृतीमुळे कला-संस्कृती क्षेत्रातील संवेदनशीलतेचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.

पूरग्रस्तांसाठी झी 24 तासचा उपक्रम ठरतोय खास

‘फक्त लढ म्हणा’ या मोहिमेद्वारे झी 24 तासने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, शासकीय अधिकारी आणि समाजातील दानशूर व्यक्ती या माध्यमातून मदतीचा हात पुढे करत आहेत. या उपक्रमामुळे पूरग्रस्तांना केवळ आर्थिक सहाय्यच नव्हे तर मानसिक बळ, शिक्षण आणि आत्मनिर्भरतेचा आधार मिळत आहे.

झी 24 तासच्या या उपक्रमामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, माध्यमं ही केवळ बातम्या देण्यासाठीच नाहीत तर समाज बदलासाठीही शक्तिशाली माध्यम ठरू शकतात.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More