23 वर्षांची श्रीलीला 2 मुलांची आई; 11 वर्ष मोठ्या कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये? एकूण नेटवर्थ माहितीये का?

Sreeleela Kids and Net Worth : वयाच्या 23 व्या वर्षी श्रीलीला ही दोन मुलांची आई आहे आणि तिची आई ही बंगळुरुमधील लोकप्रिय गायनॅकोलॉजिस्ट आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Mar 13, 2025, 11:27 AM IST
23 वर्षांची श्रीलीला 2 मुलांची आई; 11 वर्ष मोठ्या कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये? एकूण नेटवर्थ माहितीये का?
(Photo Credit : Social Media)

Sreeleela Kids and Net Worth : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि श्रीलीला हे काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे कार्तिकची आई माला यांनी जयपुरमध्ये एका अवॉर्ड शोमध्ये त्यांच्या रिलेशनशिपवर हिंट दिली. जेव्हा त्यांना त्यांच्या होणाऱ्या सुनेविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की कुटुंबाला एक चांगली डॉक्टर पाहिजे. त्यानंतर सगळे श्रीलीलाविषयी बोलू लागले कारण ती अभिनेत्री असण्यासोबत तिनं मेडिकलमध्ये शिक्षण केलं आहे. 

श्रीलीलानं मेडिकलमध्ये शिक्षण केलं आणि त्यासोबत अभिनय देखील केला. 2021 मध्ये श्रीलीलानं एमबीबीएस पूर्ण केलं. 'किस' या चित्रपटातून तिन अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ती एक ट्रेन्ड भरतनाट्यम डान्सर आहे. श्रीलीला ही बंगळुरुच्या गायनॅकोलॉजिस्ट स्वर्णलता यांची लेक आहे. श्रीलीलाचा जन्म हा तिचे आई-वडील विभक्त झाल्यानंतर झाला. दरम्यान, श्रीलीला आणि कार्तिक आर्यन हे दोघं खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही. याविषयी त्या दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sreeleela (@sreeleela14)

 2022 मध्ये श्रीलीलानं अनाथआश्रमात जाऊन गुरु आणि शोभिता नावाच्या दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतलं आहे. त्यांना चांगलं आयुष्य मिळावं यासाठी तिनं हा निर्णय घेतला. रिपोर्ट्सनुसार, श्रीलीलानं तिचा 'बाय टू लव' हा चित्रपट प्रदर्शित होण्या आधी हा निर्णय घेतला होता. एका रिपोर्टनुसार, श्रीलीलाची एकूण नेटवर्थ ही जवळपास 15 कोटी आहे. सुरुवातीला चित्रपटासाठी प्रत्येकी एक तास असे 4 लाख मानधन घेतलं. त्यानंतर तिचं मानधन वाढवत 1.5 कोटी घेऊ लागली. त्यानंतर ती आता 3 कोटी मानधन म्हणून घेते. तिनं शेवटी 4 कोटी मानधन घेण्यास सुरुवात केली. 

कार्तिक आर्यन आणि श्रीलीला पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. अनुराग बसूच्या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. 'आशिकी 3' या चित्रपटात ते दोघं दिसणार आहेत. टीझरमध्ये कार्तिक हा 'तू मेरी जिंदगी' गाणं गाताना दिसणार आहे. त्याच्या रोमॅन्टिक सीनची झलक या टीझरमध्ये दिसली आहे. तर हा चित्रपट यंदाच्या वर्षी अर्थात 2025 दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.