Avneet Kaur : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्र अवनीत कौर ही नेहमीच चर्चेत असते. तिनं फार कमी वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अवनीत ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते आणि सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. या सगळ्यात आता अवनीतनं नुकताच खुलासा केला की होळीच्या दिवशी तिच्यासोबत एका मुलानं घाणेरडं कृत्य केलं.
खरंतर हाउटफ्लायला दिलेल्या मुलाखतीत अवनीतनं गप्पा मारत असताना होळीच्या दिवशी झालेल्या अशा घटनेविषयी सांगितलं ज्यानं सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. अवनीत यावेळी बोलताना म्हणाली, 'होळी होती आणि मी एका मुलाला सांगितलं की माझ्यावर पाण्याचे फुगे फोडू नकोस, तरी त्यानं ऐकलं नाही आणि त्यानं माझ्या पार्श्वभागावर पाण्याचे फुगे मारले. मी विचार केला आता तर तू गेलास. सगळ्यात आधी तुला सांगितलं तरी तू ऐकला नाहीस आणि तुला माहित नाही की मी कशी मुलगी आहे. मी बॅट घेतली आणि त्याला चांगलाच चोप दिला.'
अवनीतनं पुढे सांगितलं की बॅटनं मारल्यानंतर त्याची आई माझी तक्रार करण्यासाठी माझ्या आईकडे गेली. याविषयी सविस्तर सांगत अवनीत म्हणाली, "मग त्या मुलाची आई माझ्या आईकडे तक्रार करत म्हणाली तुमच्या मुलीनं माझ्या मुलाला मारलं. माझी आई म्हणाली, 'कारण त्यानं कामचं तसं केलं तर ती आणखी काय करणार?' "
अवनीतनं सांगितलं की "जेव्हा केव्हा ती शाळेच्या पॅसेजमधून जायची तेव्हा तिच्या वर्गातले किंवा शाळेतली मुलं तिची खिल्ली उडवत म्हणायचे, 'ए, बंटी, तेरा साबुन...' ही तिच्यासाठी एक त्रासदायक गोष्ट झाली होती. त्यामुळे ती सोशल इंटरॅक्शन किंवा कोणाला भेटायची सुद्धा नाही. मी एक स्टार असल्यामुळे लोकांनी हे ठरवलं होतं की माझा स्वभावही तसाच असेल. मी अशीच आहे, पण लोकांना कोण समजणावर."
दरम्यान, अवनीत कौरच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच 'लव इन वियेतनाव' आणि टॉम क्रुझच्या 'मिशन: इम्पॉसिबल - द फाइनल रेकनिंग: पार्ट टू' मध्ये दिसणार आहे.