इरफान खानच्या लेकाचा बॉलिवूडमधून ब्रेक; बिग बजेट चित्रपटही सोडला, बाबिलच्या तडकाफडकी निर्णयाचे कारण काय?

Babil Khan Announced Break: बॉलीवूड अभिनेता बाबिल खानने चित्रपटांमधून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली आहे. तसंच, साई राजेश यांचा चित्रपटही त्याने सोडला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 19, 2025, 11:28 AM IST
इरफान खानच्या लेकाचा बॉलिवूडमधून ब्रेक; बिग बजेट चित्रपटही सोडला, बाबिलच्या तडकाफडकी निर्णयाचे कारण काय?
Babil Khan Announced A Break From Films Shared A post On Instagram

Babil Khan Announced Break: दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा आणि अभिनेता बाबिल खान याने सिनेसृष्टीतून काही काळासाठी ब्रेक घेत असल्याची घोषणा केली आहे. बाबिलने शनिवारी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. दिग्दर्शक साई राजेश आणि बाबिल यांच्यात झालेल्या मतभेदानंतर बाबिलने त्यांच्या चित्रपटातूनही माघार घेतली आहे. तसंच, काही काळ चित्रपटातून ब्रेक घेऊन सुट्टीवर जाणार असल्याचे बाबिलने म्हटलं आहे. 

शनिवारी एका इन्स्टाग्राम पोस्टवरुन तो ब्रेक घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, खूप हिम्मत, धैर्य आणि आत्मसन्मानासह मी आणि साई राजेश सर आम्ही दोघं मिळून एक जादुई प्रवासासाठी निघालो होते. मात्र दुर्दैवाने काही परिस्थितीमुळं व अन्य कारणांमुळं या गोष्टी घडू शकल्या नाहीत. आम्ही ठरवल्याप्रमाणे काहीच होऊ शकले नाही, असं त्याने म्हटलं आहे. तसंच, पुढे म्हटलं आहे की, मी काही काळासाठी ब्रेक घेत आहे. त्यासाठी साई राजेश सर आणि चित्रपटाच्या टीमच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देत आहे. मला माहितीये की आपल्यात खूप प्रेम आहे आणि भविष्यात लवकरच भेटून एकत्र काम करू शकतो. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाबिल खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत त्याने बॉलिवूडला फेक असं म्हटलं होतं. तसंच, अनन्या पांडे, अर्जून कपूर यासह अनेक अभिनेत्याची नावे त्याने या व्हिडिओत घेतली होती. मात्र नंतर हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरुन डिलीट करण्यात आला. त्यानंतर बाबिल खानच्या टीमकडून सारवासारवदेखील करण्यात आली होती. तसंच, बाबिलनेही माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असं म्हटलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Babil (@babil.i.k)

बाबिल खानचे आत्तापर्यंतचे करिअर 

बाबिलच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, बाबिलने करिअरच्या सुरुवातीलाच त्याचे दिवंगत वडील इरफान खानचा चित्रपट करीब करीब सिंगलमध्ये कॅमरा असिस्टेंट म्हणून काम केले होते. त्यानंतर त्याने क्वाला चित्रपटात तृती डिमरीसोबत काम केले होते. अभिनेता म्हणून त्याचा हा पहिला चित्रपट होता. त्यानंतर फ्रायडे नाइट प्लान आणि द रेल्वे मॅनमध्येही त्याने भूमिका साकारली होती. अलीकडेच त्याची लॉगआउट हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.