Baghban Actor Magician : 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बागबान' या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटात ज्या कलाकारांनी काम केलं त्या सगळ्यांना या चित्रपटातून खरी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात अमन वर्मा यानं अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा मोठा मुलगा अजय मल्होत्राची भूमिका साकारली होती. बागबानमधून अमन वर्माला इतकी लोकप्रियता मिळाली की तो प्रत्येक हिंदी चित्रपटात दिसला आणि त्यानं अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं. तुम्हाला माहित आहे का की जवळपास दीड दशक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर आज अमन वर्मा काय करतोय?
अमन वर्मा सगळ्यात शेवटी लकीरे या चित्रपटात दिसला होता. तर मिश्री या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये दाखवले होते. त्याशिवाय 2023 मध्य त्यांनं हंसल मेहताची वेब सीरिज स्कॅम 2003 मध्ये काम केलं. तो सध्या चित्रपट, टीव्ही शोज आणि सीरिजपासून दूर आहे. अभिनयापासून दूर अमन हा जादूगार म्हणून काम करतोय. स्वत: त्यानं इन्स्टाग्राम हॅन्डलवर जादू करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओत अमन वर्मा जादू करताना दिसला. व्हिडीओसोबत अभिनेत्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'इथून मी जादुगार होण्याचं शिकलं. थोडं कठीण होतं पण मॅनेज केलं. हा सगळा हाताचा खेळ आहे. मित्र-मैत्रिणींनो, जादूगर येतोय ज्याचं नाव आहे अमन यतन वर्मा.'
हेही वाचा : 'तुम्ही कितीही रडलात, काहीही केलं तरी काही होणार नाही...'; दीपिकाची नणंद भावूक, 'अल्लाहवर विश्वास...'
अमन वर्माचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झालं आणि लोकांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांना प्रश्न विचारले. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की, भाऊ हे कोणत्या क्षेत्रात आलास? यावर अभिनेत्यानं उत्तर देत सांगितलं की त्यानं पोटापाण्यासाठी हा निर्णय घेतला. दुसरा नेटकरी म्हणाला, इतका टॅलेन्टेंड अभिनेता आहे तरी काय काय करावं लागतं. त्यावर अमननं त्याच्या इनकमला घेऊन हिंट दिली. त्यानं सांगितलं की 'भावा काम काम आहे, छोटं काय किंवा मोठं काय. जर मी तुम्हाला सांगितलं की जितके पैसे मला हे करायला मिळत आहे तर तुम्ही त्या व्यक्तीला असिस्टंट म्हणून घ्याल ज्यान मला ही बॉटल दिली.'