घेणं न देणं टॉपला येणं... अभिषेक-ऐश्वर्यामुळे अमिताभ, जया नाही तर `ही` सेलिब्रेटी World Top 10 मध्ये
Year Ender 2024 Global Searched Celebrities : ग्लोबली `या` सेलिब्रिटींना नेटकऱ्यांनी केलंय सर्च, त्यात अभिषेक-ऐश्वर्यामुळे या सेलिब्रिटीची चर्चा
Year Ender 2024 Most Searched Celebrities on Google : गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघे सतत चर्चेत आहेत. ते दोघं चर्चेत असण्याचं कारण ते विभक्त झाल्याच्या अफवा किंवा ते दोघं घटस्फोट करणार असल्याची माहिती. त्यात भर जर कोणत्या गोष्टीमुळे पडली तर ती म्हणजे अभिषेकचं नाव जेव्हा एका अभिनेत्रीसोबत जोडण्यात आलं तेव्हा. अभिषेकचं नाव कोणत्या अभिनेत्रीसोबत जोडण्यात आलं या विषयी सगळ्यांनाच कल्पना आहे. अजूनही तुमच्या लक्षात आलं नसेल तर त्या अभिनेत्रीचं नाव आहे निम्रत कौर. गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या विभक्त होण्याचं कारण निम्रत कौर असल्याची चर्चा सुरु झाली होती.
दरम्यान, निम्रतनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असेल तरी आता तिला नेटकरी हे तिच्या कामासाठी नाही तर अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाचं ती खरंच कारण आहे का याविषयी त्यांना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे अनेक नेटकरी सतत तिच्याविषयी सर्च करत होते. दरम्यान, या सततच्या सर्चमुळे निम्रत कौरही ग्लोबल Year Ender 2024 च्या टॉप 10 च्या यादीत आली आहे. याचा अर्थ जगात सगळ्यात जास्त सर्च करण्यात आलेल्या भारतीयांमध्ये निम्रतचं देखील नाव आहे.
दरम्यान, Year Ender 2024 Top 10 World Search मध्ये आणखी कोणत्या कोणत्या सेलिब्रिटींची नावं आहेत ते जाणून घेऊया.
1. पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचा स्टॅंडअप कॉमेडियन आणि अभिनेता केट विलियम्स
2. दुसऱ्या क्रमांकावर तेलगू अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण.
3. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकी अभिनेता अॅडम ब्रॉडी आहे.
4. चौथ्या क्रमांकावर ब्रिटिश अभिनेत्री Ella Purnell आहे.
5. पाचव्या स्थानावर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान आहे.
हेही वाचा : Year Ender 2024 : गुगलवरही दाक्षिणात्य चित्रपटांचाच दबदबा; 'ही' टॉप 10 यादी एकदा पाहाच
6. सहाव्या क्रमांकावर अमेरिकन अभिनेता Kieran Culkin होता.
7. अमेरिकन अभिनेता टेरेंस हावर्ड हा सातव्या क्रमांकावर आहे.
8. आठव्या क्रमांकावर पुन्हा एकदा एक भारतीय असून ती निम्रत कौर आहे.
9. नवव्या क्रमांकावर अमेरिकेची अभिनेत्री सटन फोस्टर आहे.
10. दहाव्या क्रमांकावर ब्रिगिट मरीना बूजो आर्किला आहे.