कतरिनाच्या आधी विकी कौशल या सौंदर्यवती अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा; मग अचानक त्याने पाठ फिरवली अन्...

विकी कौशल आता कतरिना कैफसोबत आनंदी वैवाहिक जीवन जगत आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, विकी कौशलचं पहिलं प्रेम कतरिना नाही तर दुसरी अभिनेत्री होती. त्या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या पण खूप गाजल्या होत्या.   

नेहा चौधरी | Updated: May 16, 2025, 04:54 PM IST
कतरिनाच्या आधी विकी कौशल या सौंदर्यवती अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा; मग अचानक त्याने पाठ फिरवली अन्...

Vicky Kaushal love Life : बॉलिवूडमध्ये अनेक लव्ह अफेयर आहेत. अनेक अभिनेता अभिनेत्रीचं लव्ह अफेयर हे लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अनेक वर्षे प्रेमात असलेले बॉलिवूडमधील कपल अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी येते आणि चाहत्यांना धक्का बसतो. असंच काही तरी उरी आणि छावा फ्रेम अभिनेता विकी कौशल याच्याही आयुष्यात घडलं आहे. अनेकांना माहिती नाही, कतरिना कैफसोबत लग्न करण्यापूर्वी विकी कौशलचं एका अभिनेत्रीबरोबर अफेयर होतं. पण अचानक त्यांचा ब्रेकअप झालं. कोण होती ती अभिनेत्री तुम्हाला माहिती आहे का?

ब्रेकअपनंतर विकी कौशलने करितनासोबत लग्न केलं. पण ब्रेकअपच्या 6 वर्षांनंतरही अभिनेत्री आजही अविवाहित आहे. मीडिया रिपोर्टनुसार विकी कौशल या अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा होता.  ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून हरलीन सेठी आहे. दोघांनीही त्यांचे प्रेम कधीही लपवले नाही. दोघेही उघडपणे एकमेकांना पाठिंबा देताना दिसले. एक काळ असा होता जेव्हा हरलीन सेठी विकी कौशलच्या मनावर राज्य होती. हरलीनने अनेक ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. 'ब्रोकन बट ब्युटीफुल' ही तिची सर्वात आवडती वेब सिरीज आहे, ज्यामध्ये ती विक्रांत मेस्सीसोबत दिसली होती. या मालिकेच्या प्रमोशन दरम्यान, विकी तिला पाठिंबा देण्यासाठी आला होता आणि 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' दरम्यान, हरलीन अभिनेत्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करत होती. अलिकडेच ती शरद केळकरसोबत एका रोमँटिक वेब सीरिजमध्ये दिसली. 

जेव्हा हरलीन आणि विकीची लव्ह स्टोरी सुरू झाली तेव्हा दोघांनीही ती जगासमोर दाखवली. पण, जेव्हा त्यांचे ब्रेकअप झाले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. दोघांमधील प्रेम कसे संपले यावर लोकांना विश्वासच बसत नव्हता. विकी कौशलने नेहमीच त्याचे आणि हरलीनचे नाते सार्वजनिक ठेवलं, पण त्याने कधीही ब्रेकअपबद्दल बोलले नाही. यावर त्याने नेहमीच मौन पाळला आहे. तो अनेकदा म्हणायचा की, तो एका सुंदर मुलीसोबत आहे आणि अप्रत्यक्षपणे हरलीनचा उल्लेख करायचा. विकी आणि हरलीनची पहिली भेट एका पार्टीत झाली आणि येथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. विकीने स्वतः सांगितले की जेव्हा त्याने हरलीनला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला आणि तिच्यासोबत वेळ घालवण्याचा आनंद घेत होता.

ब्रेकअपमुळे अभिनेत्री नैराश्यात

2019 मध्ये विकी आणि हरलीनच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. जरी दोघांनीही कधीही त्याचे कारण उघडपणे सांगितले नाही. हरलीनने एकदा म्हटलं होतं की, तिला ब्रेकअपचा अजिबात त्रास होत नाही आणि जेव्हा लोक तिला तिच्या माजी प्रेयसीच्या नावाने हाक मारतात तेव्हा तिला अस्वस्थ वाटते. हरलीनने अचानक तिच्या इंस्टाग्रामवरून विकीला अनफॉलो केल्यावर विकी आणि हरलीनचे ब्रेकअपची भनक चाहत्यांना लागली. त्यावेळी विकी आणि कतरिना कैफ यांच्यातील जवळीकतेच्या बातम्याही येत होत्या आणि असं म्हटलं जातं की कतरिना आल्यानंतर हरलीनने विकीपासून स्वतःला दूर केलं. यानंतर ती खूप निराश झाली आणि नैराश्याची शिकार झाली होती. ती बराच काळ तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकली नव्हती.