लग्नाआधी कतरिनाच्या एक्स बॉयफ्रेंडने विकी कौशलला धमकावलं, म्हणाला...

विकी कौशल सध्या कतरिना कैफसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. 

Updated: Nov 28, 2021, 05:26 PM IST
 लग्नाआधी कतरिनाच्या एक्स बॉयफ्रेंडने विकी कौशलला धमकावलं, म्हणाला...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या कतरिना कैफसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. त्याचवेळी अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबाबत देखील अनेक बातम्या समोर येत आहे.

दरम्यान, इन्स्टाग्रामवर रणबीर आणि विकीचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यावर चाहत्यांनी खूप मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

वास्तविक, नुकतेच एका सेलिब्रिटींचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरने रणबीर कपूर आणि विकी कौशलचे काही फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये दोघेही हसताना दिसत आहेत. आता हे दोन्ही स्टार्स लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत, अशा परिस्थितीत चाहत्यांनी या पोस्टवर खूप मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

चाहत्यांनी मजेदार कमेंट्स केल्या

एका चाहत्याने या फोटोवर लिहिले- रणबीर विकीला म्हणतो- 'भावा कतरिनाची काळजी घे'. त्याचवेळी दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, 'दोघेही एकमेकांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.' दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'मेरी एक्स तेरी बीवी है, जोश कैसा आहे.' कारण एकेकाळी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एकमेकांना डेट करत होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

अधिकृत माहिती उघड झाली नाही

चाहत्यांच्या कमेंट्स एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, 'विकी म्हणतोय - चन्ना मेरेया हे गाणं माझ्या लग्नात गाऊ नकोस.' याशिवाय एका चाहत्याने लिहिले- 'सलमान खानला घाबरू नका.' एकेकाळी सलमान आणि कतरिनाच्या नात्याची बातमी समोर आली होती.

कतरिनाची काळजी घेण्याची चेतावनी रणबीर विकीला देत असल्याचं ही अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.

यानंतर कतरिनाचे नाव रणबीरसोबत जोडले गेले. विशेष म्हणजे रणबीर-आलिया आणि विकी-कतरिनाच्या लग्नाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.