आज चित्रपटांची आहे मोठी स्टार, एकेकाळी अडकली होती ही अभिनेत्री सेक्स स्कँडलमध्ये

 इंडस्ट्रीत अशी एक अभिनेत्री आणि ब्यूटी क्वीन आहे जिचं नाव देशातल्या सगळ्यात मोठ्या सेक्स स्कँडल मध्ये आलं होतं.

Updated: Sep 26, 2021, 04:33 PM IST
आज चित्रपटांची आहे मोठी स्टार, एकेकाळी अडकली होती ही अभिनेत्री सेक्स स्कँडलमध्ये

मुंबई : भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचा बिहार, झारखंड किंवा पूर्व उत्तर प्रदेशशी कोणतचं नातं नाहीये. असं असूनही ती आज भोजपुरी सिनेसृष्ट्रीतलं सगळ्यात मोठं नाव बनल्या आहेत. महाराष्ट्रातली राणी चॅटर्जी ते अंतरा विश्वास म्हणजेच ​​मोनालिसा अशी नावे या यादीत समाविष्ट आहेत. भोजपुरी इंडस्ट्रीशी निगडीत अनेक अभिनेत्री आहेत. ज्या अलीकडेच अनेक वादात अडकल्या आहेत. ज्यामुळे त्यांना बदनामीला सामोरं जावं लागलं आहे.

भोजपुरी इंडस्ट्रीत अशी एक अभिनेत्री आणि ब्यूटी क्वीन आहे जिचं नाव देशातल्या सगळ्यात मोठ्या सेक्स स्कँडल मध्ये आलं होतं. या अभिनेत्रीचा वादांशी दीर्घ संबंध आहे. सगळे वाद असूनही, या अभिनेत्रीने भोजपुरी सिनेमात आपलं नशीब आजमावलं आणि चित्रपटांचा एक मोठा चेहरा बनली. जाणून घ्या ती अभिनेत्री आहे तरी कोण जिने, वादात अडकल्यानंतर देखील इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.

ब्यूटी क्वीन म्हणून झाली सुरुवात
भोजपुरी चित्रपटातील या अभिनेत्रीचं नाव अनारा गुप्ता आहे. आज ती इंडस्ट्रीमधील सगळ्यात चर्चित चेहरा आहे. तिने मिस जम्मूचा किताब पटकावला होता. अनाराने अवघ्या 15व्या वर्षी हे विजेतेपद पटकावलं.

सेक्स स्कँडलमध्ये नाव
2004 साली तिच्या सेक्स सीडी बाजारात येण्याच्या घटनेने सर्वांना आश्चर्यचकित केलं. ही सीडी बाजारात आल्यानंतर तिला तिच्या आईसह तीन भावांना अटक करण्यात आली. नंतर फॉरेन्सिक अहवालाने दुसरी मुलगी असल्याचा दावा केला. पण त्यांना हा डाग काढायला बराच वेळ लागला.

असं म्हटलं जातं की, अनारासोबत सीडीमध्ये दिसणारा मुलगा राजकारणीचा मुलगा होता आणि या सीडी घोटाळ्यात त्याचा हात होता. अनारा गुप्तावर 'अनारा' नावाचा चित्रपटही बनवण्यात आला होता. ज्यात अनाराने स्वतः अभिनय केला होता. जरी हा चित्रपट फ्लॉप ठरला.