In Text Book: कपिल शर्मा बनला प्रेरणा, इयत्ता चौथीच्या पुस्तकात कॉमेडी किंग कपिलचा धडा

इयत्ता ४थी मधील मुलं जीकेच्या पुस्तकातून कपिल शर्माचा विषय वाचून आपल्या जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी सक्षम होतील.

Updated: Apr 9, 2021, 09:27 PM IST
In Text Book: कपिल शर्मा बनला प्रेरणा, इयत्ता चौथीच्या पुस्तकात कॉमेडी किंग कपिलचा धडा

मुंबई : भारताचा एक नंबर कॉमेडी स्टार कपिल शर्मा यांचे जीवन आता मुलांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग बनला आहे. इयत्ता ४थी मधील मुलं जीकेच्या पुस्तकातून कपिल शर्माचा विषय वाचून आपल्या जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी सक्षम होतील. कपिलने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याच्या एका फॅन क्लबने ती पोस्ट केली आहे, त्यात कपिलचा धडा पुस्तकात दाखवला आहे. कपिलने ती पोस्ट रिपोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसू शकतं की कपिलने लिहिलं आहे की, फोटोमध्ये दिसत असलेल्या धड्यामध्ये कपिल शर्माचा फोटो आहे. दुसर्‍या फोटोमध्ये तो आपल्या टीमसोबत उभा आहे, यात त्याच्या शोचा जुना पार्टनर नवज्योतसिंग सिद्धूही दिसत आहे. त्याचा आणखी एक फोटो आहे जो किस-किस को प्यार करूं या त्याच्या हिट चित्रपटातला आहे. या चाप्टरचं शीर्षक आहे The comedy king kapil sharma.

कपिलला काही तोड नाही
हे स्पष्ट आहे की, कपिल शर्माने आजवर मिळवलेलं स्थान भारताच्या विनोदी कलाकारांच्या इतिहासातील सर्वात मोठे आहे. कपिल एका दशकापेक्षा जास्त काळ टीव्हीचा राजा आहे. स्टँड अप कॉमेडीपासून सुरू झालेली त्याची कारकीर्द आज किंग ऑफ कॉमेडीच्या पदावर पोहोचली आहे.

आता नेटफ्लिक्सवर करणार डेब्यू
कपिल शर्माचा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी बंद झाला. यानंतर कपिलने जाहीर केले की, तो लवकरच नेटफ्लिक्सवर आपला कॉमेडी शो आणत आहे. ज्याचं स्वरूप त्याच्या टीव्ही शोपेक्षा पूर्णपणे वेगळं असेल.

मेहनती ने बनला सुपरस्टार
कपिलने अनेकवेळा सांगितलं आहे की, त्याने बराच काळ संघर्षाचा पाहिला आहे. अमृतसर ते मुंबई या शहरात येतानाही त्याला खूप वाईट टप्पा पहावा लागला. पण त्याने कधीच हार मानली नाही, याचा परिणाम आज संपूर्ण जगासमोर आहे. कपिलने जगातील जवळपास सर्व मोठ्या शहरांमध्ये आपले कार्यक्रम केले आहेत, त्यासाठी ते भरमसाठ फी देखील आकारतात. त्याने आपला कार्यक्रम अशा स्तरावर नेला आहे की, जिथे त्याच्या शोमध्ये प्रमोशन केल्याशिवाय कोणताही मोठा सुपरस्टार पुढे जात नाही

कॉन्ट्रोवर्सीचा देखील आहे किंग
कपिल जस जसा हिट होत गेला तस तस तो कॉन्ट्रोवर्सीचा देखील किंग बनला. त्याच्याच शोचा स्टार सुनील ग्रोव्हरशी झालेल्या त्याच्या भांडणामुळे प्रसारित होत असलेल्या बातम्या बर्‍याच वर्षांपासून माध्यमात चर्चेत आहेत. एकदा कपिलने रात्री पत्रकारांनाही रागाच्या भरात फोन करुन शिवीगाळ केली होती. दोन महिन्यांपूर्वी त्याने विमानतळावरील फोटोग्राफरलाही शिवीगाळ केली होती.