Dharmendra On jamal Kudu dance: 89वर्षीय ज्येष्ठ चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना 31 ऑक्टोबर रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या तब्येत खालावल्यामुळे चाहते खूप चिंतेत होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असून एका रिअेल्टी शोमधील त्यांच्या जमाल कुडू गाण्यावरील डान्स चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे.
बॉबी देओलचा 'अॅनिमल' हा चित्रपट 2023मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यातील 'जमाल कुडू' हे गाणे खूप लोकप्रिय झाले आणि या गाण्यातील त्यांच्या हालचालींनी संपूर्ण जगाला नाचायला लावले. शो दरम्यान बॉलिवूडच्या 'ही-मॅन'सोबत सलमान खानदेखील मनसोक्त नाचताना दिसला.
रिअेल्टी शोच्या एका एपिसोडमध्ये धर्मेंद्र, अभिनेता सलमान खान, सोहेल खान आणि अरबाज खान यांना भेटले. शोच्या मंचावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. विनोदी कलाकार कृष्णा अभिषेकने देखली त्या शोमध्ये हजेरी लावली. दरम्यानच त्याने विनोदाने सांगितले की "धर्मेंद्रजी हे घ्या बिल (पावती) भरा, बॉबी देओलच्या जमाल कूडू गाण्याची नक्कल करता करता लग्न समारंभांमध्ये तुटलेल्या असंख्य ग्लासचा हा बिल आहे." नंतर, कृष्णाने धर्मेंद्रसह सर्व स्टार्सना गाण्याचे हुक स्टेप करुन पाहायला सांगितले.
धर्मेंद्रने सोहेल आणि कृष्णाच्या मदतीने आपल्या मुलाच्या गाजलेल्या गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय खोडकर मूडमध्ये, धर्मेंद्र यांनी ग्लास धरून नंतर मद्यपान केल्यासारखं नाटक देखील केलं हे पाहताचं धर्मेंद्रसह सगळे हसू लागले. त्याच एपिसोडमध्ये बॉबी देओलने वडील धर्मेंद्र यांना 63 वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रिय असल्याबद्दल अभिनंदन केले त्याच्या भावनिक शब्दांनी 'ही मॅन'ला अश्रू अनावर झाले.
हे ही वाचा: Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांची प्रकृती कशी? देओल कुटुंबाने दिली माहिती, 'आज सकाळी 7.30 ला...'
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल बोलायचे झाले, तर सोशल मीडियावर असंख्य अफवा पसरत आहेत मात्र धरम पाजी यांची प्रकृती सध्या स्थरिवली आहे. त्यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओलने सोशल मीडिया हँडलवरील अशा बातम्यांचे त्वरित खंडन केले. तर अलीकडील महितीनुसार त्यांना डिसचार्ज मिळाला आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.