अरेच्चा, हा तर....! सुशांत सिंह राजपूतसारख्याच दिसणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्याला पाहून चाहते संभ्रमात

पाहा नेमकं काय झालं... 

Updated: Oct 21, 2021, 10:56 AM IST
अरेच्चा, हा तर....! सुशांत सिंह राजपूतसारख्याच दिसणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्याला पाहून चाहते संभ्रमात
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानं चाहत्यांना जबर धक्का बसला. सुशांतची आत्महत्या सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. असं असलं तरीही स्वप्न पाहणं कधीही सोडू नका हा त्यानं दिलेला संदेश चाहत्यांनी खऱ्या अर्थानं मनात रुजवला. सुशांतची जिज्ञासा, विज्ञानाप्रती त्याची अभिरुची हे सारंकाही कधीच कोणापासून लपू शकलं नाही. याच आवडीप्रती त्यानं घरातच एक मोठी दुर्बिणही आणली होती, ज्या माध्यमातून ते थेट चंद्र- तारे पाहू शकत होता. 

सुशांतच्या या आवडीची एकाएकी चर्चा होण्यामागचं कारण ठरतोय तो म्हणजे अभिनेता आयुष्यमान खुराना. आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) हा सध्या त्याच्या कुटुंबासमवेत मालदीव येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. 

नुकतंच त्यानं या सुट्ट्यांदरम्यान वेळ काढत सुरेख फोटो चाहत्यांसाठी शेअर केला. जिथं ग्रहनिरीक्षणाचा अनुभव त्यानं या फोटोच्या कॅप्शनमधून व्य़क्त केला. चंद्र, शनी, गुरु पाहण्याचा अनुभव सांगणाऱ्या आयुष्माननं चंद्राचाही एक फोटो शेअर केला. 

आयुष्माननं हा फोटो शेअर करताच चाहत्यांना लगेचच अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आठवण आली. सुशांतनंही त्याच्या घरात असणाऱ्या महाकाय दुर्बिणीसोबत काही फोटो पोस्ट केले होते, शिवाय हा अभिनेताही ग्रह- ताऱ्यांमध्ये रमत होता. त्यामुळं आयुष्मान आणि त्याच्या या फोटोतील साम्य चाहत्यांनी हेरत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला.