पाचगणीमध्ये कार्तिक आर्यनचा Wrong Turn; पोलिसांनी त्याला गाठलं आणि....

पोलीस समोर येताच कार्तिकनं.... 

Updated: Sep 21, 2021, 02:24 PM IST
पाचगणीमध्ये कार्तिक आर्यनचा Wrong Turn; पोलिसांनी त्याला गाठलं आणि....
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

पाचगणी : अभिनेता कार्तिक आर्यन हा हिंदी चित्रपट वर्तुळातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक. कोणाचाही वरदहस्त नसताना आपल्या कलेच्या बळावर या अभिनेत्यानं वाखाणण्याजोगं यश संपादन केलं आहे. अनेक चांगल्या चित्रपटांसाठी त्याची वर्णीही लागत आहे. अशाच एका चित्रपटाच्या निमित्तानं कार्तिक सध्या महाराष्ट्रातील पाचगणी या ठिकाणी पोहोचला आहे. 

अनेकांसाठी पाचगणी हे पर्यटनस्थळ, पण कार्तिक मात्र इथं त्याच्या कामानिमित्तानं पोहोचला आहे. पण, इथे त्याला पोलिसांनी अडवल्याची घटना घडली. कार्तिकसोबत पुढे नेमकं काय घडलं हे एका व्हिडीओच्या निमित्तानं समोर आलं. 

चित्रीकरणाच्या निमित्तानं कार्तिक एके ठिकाणी जाण्यास निघाला. यावेळी तो वाट चुकला आणि तिथेच भरकटला. चुकीच्या वळणावरुन कार नेत असल्याचं त्याच्या लक्षात येताच थांबत त्यानं मदतीसाठी आवाज दिला. याचवेळी तिथे काही पोलीस आले. आणि त्यांनी कार्तिकला गाठलं. इथे झाल्या चुकीबद्दल पोलिसांनी कार्तिकला शिक्षा करण्याएवजी कुतूहलानं त्याच्या कारपाशी जात फोटो काढू का, असं म्हणत त्याच्यासोबत सेल्फी काढला. 

सर्वजण माझ्या मागे का आले, असं विचारलं असता तू वाट चुकशील ना म्हणून आलो असं उत्तर तिथे असणाऱ्या एका व्यक्तीने त्याला दिलं. यावेळी फोटो काढत असल्यामुळं चित्रीकरणासाठी उशीर तर होत नाही ना, असा प्रश्न विचारला असता, नाही नाही... हे इत्तर देत कार्तिकनं तेथे असणाऱ्यांच्याप्रती आभार व्यक्त केले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MEADIAEXPRESSO BOLLYWOOD (@mediaexpresso)

कार्तिक सध्य़ा त्याच्या 'फ्रेडी' या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं पाचगणीमध्ये चित्रीकरणासाठी पोहोचला आहे. या चित्रपटातून अलाया एफ. त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.