मुंबई : एकिकडे #MeToo या चळवळीमुळे अनेक धक्कादायक खुलासे होत असताना दुसरीकडे काही मंडळी मात्र या गंभीर मुद्द्यावर अगदी हसत हसत प्रतिक्रिया देत आहेत. लैंगिक अत्याचार, महिलांचं कामाच्या ठिकाणी किंवा समाजातील काही घचकांकजडून होणारं शोषण या विदारच परिस्थितीमुले गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चांना तोंड फुटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही या मुद्द्यावर आपलं मत माडलं. पण, यांवेळी त्यांच्या चेहऱ्यावर असणारी भावमुद्रा मात्र अनेकांनाच खटकली. 


अभिनेते संजय खान यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या अनावरण सोहळ्याच्या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी अभिनेत्री हेमा मालिनी यांना #MeToo विषयी काही प्रश्न विचारले. 


अतिशय गंभीर अशा या मुद्द्यावर प्रश्न देत मालिनी यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हास्य उमटल्यामुळे ही बाब बरीच चर्चेत आली. 


'अनेक महिला #MeToo च्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. असं असलं, तरीही महिलांना सर्वप्रथम स्वत:चं संरक्षण करता आलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी कोणावरच अवलंबून राहता कामा नये, त्यांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक विचारांच्या व्यक्तींना ओळखलं पाहिजे. कारण ही एक अशी बाब आहे ज्याच कोणी दुसरं तुमची मदत करु शकणार नाही', असं मत त्यांनी मांडलं. 


सोशल मीडियामुळे चर्चेचा विषय ठरणाऱ्या #MeToo अंतर्गत अनेक नावं समोर आली आहेत, याविषयी तुम्ही काय म्हणू इच्छिता?, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. 


'मला काहीच वाटत नाही', असं उत्तर देत मिश्किल हास्यासह त्या पुढील कार्यक्रमासाठी निघून गेल्या. 


मालिनी यांचं हे वागणं अनेकांनाच खटकलं. मुख्य म्हणजे कलाविश्वासोबतच देशाच्या राजकीय वर्तुळातही त्यांचा वावर आहे, त्यामुळे त्यांच्याकडून असं उत्तर मिळणं अनेकांसाठीच अनपेक्षित होतं हे खरं.