करीनाला का द्यावा लागलेला न्यूड सीन? नंतर अशी झाली अवस्था...

हो मी न्यूड झाले होते... 

Updated: Sep 21, 2021, 11:22 AM IST
करीनाला का द्यावा लागलेला न्यूड सीन? नंतर अशी झाली अवस्था...
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सध्या पती सैफ अली खान आणि तैमुर, जे या दोन्ही मुलांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. यासाठी तिनं मालदीव या ठिकाणाला पसंती दिली आहे. सोशल मीडियावर ती या खास क्षणांचे काही फोटोही शेअर करत आहे. वाढदिवसानिमित्त करीनाची ही अदा चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहे. 

एकिकडे वाढदिवसाच्या निमित्तानं बेबोवर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे तिची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिनं न्यूड सीनबाबतही वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. मुख्य म्हणजे ज्या चित्रपटामध्ये करीनानं न्यूड सीन साकारला होता त्यामध्ये तिच्याआधी ऐश्वर्याच्या नावाला पसंती देण्यात आली होती. पण, गरोदरपणामुळं या चित्रपटात ऐश्वर्याऐवजी करीना झळकली. 

करीनानं अनेक बिकीनी शॉट्स दिले होते. पण, तोवर तिनं न्यूड सीन दिला नव्हता. पण, मधुर भंडारकरच्या 'हिरोईन' या चित्रपटासाठी तिला न्यूड सीन द्यावा लागला होता. यासाठी तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. तिची बदनामीही करण्यात आली होती. हे सारं करीनाच्या सहनशक्तीपलीकडील होतं. 

आपल्या अभिनयाला तो न्याय नाही मिळाला जो मिळणं अपेक्षित होतं. मी ते पात्र साारण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं, असं करीना म्हणाली होती. प्रेक्षकांना मी त्या रुपात नको हवी होते, हा काहीसं नकारात्मक होतं ज्यामुळं सगळेच संकुचित झाले. मधुर भंडारकरनं ज्य़ा पद्धतीनं हा चित्रपट साकारला होता त्यामुळं सर्वांनाच काहीशी अडचण वाटली होती. 

न्यूड सीनबाबत बोलताना मी त्य़ासाठी शंभर टक्के दिले होते आणि ते पात्र माझ्या सर्वोत्तम 5 भूमिकांपैकी एक होतं असं तिनं ठामपणे सांगितलं. आपण जे काही केलं, जे काही चित्रपटामध्ये होतं त्याचा मला गर्वच आहे अशा शब्दांत तिनं तिची भूमिका स्पष्ट केली होती. चित्रपटासाठी जे गरजेचं होतं ते मी केलं, मी न्यूडही झाले होते. पण ते सारं भयावह होतं असं सांगत ते केल्यानंतर घाबरल्य़ाचंही तिनं सांगितलं होतं.