Nora Fatehi : चित्रपटात काम देतो म्हणून काय-काय करायला लावतात निर्माते... नोरा फातेहीनं सगळंच सांगितलं

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने एका मुलाखतीत निर्माते चित्रपटात काम देतो म्हणून काय-काय करायला लावतात याबद्दल खुलासा केला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Mar 12, 2025, 12:38 PM IST
Nora Fatehi : चित्रपटात काम देतो म्हणून काय-काय करायला लावतात निर्माते... नोरा फातेहीनं सगळंच सांगितलं

Nora Fatehi Exposed Bollywood Producers: खोटं, कपट आणि ढोंग..हे सर्व शब्द बॉलिवूडशी जोडले गेले तर कोणीही नकारू शकणार नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी आतापर्यंत इंडस्ट्रीमधील अशा काही घटना सांगितल्या आहेत. ज्या ऐकून कोणालाही विश्वास बसणार नाही. या लिस्टमध्ये आता बॉलिवूडची लोकप्रिय डान्सर नोरा फतेही हिचा देखील समावेश झाला आहे.  नोरा फतेहीने तिच्या एका मुलाखतीत असे काही म्हटले आहे, ज्यामुळे इंडस्ट्रीतील आणखी एक काळे सत्य उघड झाले आहे. या मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, अनेक बॉलिवूड दिग्दर्शकांनी तिला एका मोठ्या चित्रपटाचे आश्वासन देऊन मोफत गाणी शूट करायला लावली आणि नंतर ते सर्व शक्तीनिशी निघून गेले. 

नोरा फतेहीने बंद केले संवेदनशील राहणे

कमरिया, दिलबर आणि साकी-साकी सारख्या गाण्यांमध्ये तिने धमाकेदार डान्स आणि अदांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अशातच आता तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एक इंडस्ट्रीमधील काळे सत्य उघड केले आहे. अभिनेत्री नोरा फतेहीने बीबीसी एशिया नेटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, आता तिने संवेदनशील होणे बंद केले आहे. सुरुवातीला ती खूप रडत होती. मात्र, आता तिने अशा गोष्टींसाठी रडणे बंद केले आहे. पूर्वी ती नकार, गप्पा टप्पा आणि कामाच्या अभावामुळे रडत असायची. हळू-हळू तिला जाणवू लागले की या गोष्टींचा तिच्यावर काही फरक पडत नाही. जर तू मला नाही म्हटलं आणि काम दिलं नाहीस, तर मी स्वत: साठी काम शोधेन. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एका गाण्यासाठी इतके कोटी घेते नोरा फतेही

या मुलाखतीत नोरा फतेहीने पुढे सांगितले की, तिने एजन्सी निर्माते, दिग्दर्शक यांच्यावर अवलंबून राहणे सोडले आहे. कोही लोक माझ्याजवळ आले आणि म्हणाले की जर तू आमच्या चित्रपटात एक गाणे केले तर आम्ही तुला आमच्या पुढच्या चित्रपटात घेण्याचे वचन देतो. नंतर, त्याने ते केले नाही. नंतर, हे लोक अदृश्य झाले. आता मी हे तेव्हाच करणार जेव्हा माझे मन करेल. मला त्या बदल्यात काहीही नको आहे. मी अशीच पुढे जात आहे. कॅनडामध्ये जन्मलेल्या नोरा फतेहीने मॉडेलिंग ते अभिनय असा प्रवास केला आहे. दीर्घ संघर्षानंतर नोराला 'रोअर: टायगर्स ऑफ द सुंदरबन'मध्ये गाणे गाण्याची संधी मिळाली. यानंतर नोराने अनेक चित्रपटांमध्येही काम केले. यानंतर तिने आयटम साँग करायला सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार, नोरा फतेही आता एका गाण्यासाठी 2 कोटी रुपये घेते.