बॉक्स ऑफिसची क्वीन, 6 महिन्यात 3 हिट चित्रपट, कमाई 1000 कोटी, या अभिनेत्रीने टॉपच्या अभिनेत्रींना दिली टक्कर

New Box Office Queen: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जिने 6 महिन्यात दिले 3 चित्रपट, कमाई 1000 कोटी. ठरली बॉक्स ऑफिसची क्वीन.

सोनेश्वर पाटील | Updated: Jul 5, 2025, 02:28 PM IST
बॉक्स ऑफिसची क्वीन, 6 महिन्यात 3 हिट चित्रपट,  कमाई 1000 कोटी, या अभिनेत्रीने टॉपच्या अभिनेत्रींना दिली टक्कर

Bollywood Actress: बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामधील काही चित्रपट ब्लॉकबस्टर तर काही चित्रपट फ्लॉप ठरले. 2024 मधील काही चित्रपटांनी मोठ्या प्रमाणात बॉक्स ऑफिसवर कमाई केली. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले. हा चित्रपट 2024 मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'छावा' चित्रपटाने देखील रेकॉर्ड ब्रेक कमाई करून नवा विक्रम नावावर केला. 

विक्की कौशलने या वर्षी सुपरहिट सिनेमा दिला. मात्र, 2024 आणि 2025 मध्ये एका अभिनेत्रीने 6 महिन्यांमध्ये 3 चित्रपट दिले. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. या चित्रपटांनी 800 कोटींची कमाई केली. 

ही अभिनेत्री ठरली बॉक्स ऑफिस क्वीन

अनेक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना. अभिनेत्रीने अलिकडच्या काळात रश्मिका मंदानाने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिला बॉक्स ऑफिसची क्वीन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या चित्रपटांमधून अभिनेत्रीने प्रचंड कमाई केली. यामध्ये 'पुष्पा 2' आणि 'अॅनिमल' या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटामधून अभिनेत्री रश्मिकाला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे ती निर्मात्यांची आवडती अभिनेत्री ठरली. 

रश्मिका मंदाना बद्दल सांगायचं झालं तर ती 2025 मध्ये 'छावा' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर सुमारे 807.88 कोटींची कमाई केली. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. त्यानंतर अभिनेत्री सलमान खानसोबत 'सिकंदर' या चित्रपटात दिसली. या चित्रपटाने देखील जगभरात 177 कोटींची कमाई केली. त्यानंतर रश्मिकानं धनुषसोबत 'कुबेरा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने अवघ्या 13 दिवसांमध्ये 83.55 कोटींची कमाई केली. रश्मिकाच्या या तिन्ही चित्रपटाने जवळपास 1068.43 कोटींची कमाई केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 टॉपच्या अभिनेत्रींना देते टक्कर

रश्मिका मंदाना ही तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या दमदार अभिनयामुळे नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत असते. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. मात्र, ते बॉक्स ऑफिसवर हिट झाले नाहीत. रश्मिकाने एका पाठो-पाठ तीन चित्रपट देऊन बॉक्स ऑफिस हदरवून टाकले. म्हणून तिला बॉक्स ऑफिस क्वीन म्हटलं जात आहे.