धक्कादायक! अभिनेत्रीला Undergarments, अश्लील खेळणी पाठवत होता 'तो'; पोलिसांना सुगावा लागताच...

एका घटनेनं कला जगताला हादरवलं आहे

Updated: Sep 22, 2021, 12:28 PM IST
धक्कादायक! अभिनेत्रीला Undergarments, अश्लील खेळणी पाठवत होता 'तो'; पोलिसांना सुगावा लागताच...
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : कला जगत समोरून कितीही झगमगणारं आणि सर्वांनाच हेवा वाटेल असं असलं तरीही या जगतामध्ये अनेकदा काही असे प्रसंगही घडतात, ज्यामुळं भल्याभल्याचा थरकाप उडतो. चाहते आणि कलाकारांच्या एकमेकांमधील समतोलामुळं हे सारं विश्व तग धरून आहे. पण, जेव्हा हाच समतोल बिघडतो तेव्हा मात्र कलाविश्व पुरतं बिथरतं. सध्या अशाच एका घटनेनं कला जगताला हादरवलं आहे. 

सहसा चाहते आपल्या आवडीच्या कलाकारांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना फुलं, केक, किंवा इतरही काही भेटवस्तू पाठवत असतात. पण, एका 28 वर्षीय अभिनेत्रीला मात्र अत्यंत घाणेरडा अनुभव आलेला आहे. 

मुंबई पोलिसांत सदर प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्या धर्तीवर आता पोलिसांनी तपासही सुरु केल्यां कळत आहे. मागच्या दोन महिन्यांपासून एका व्यक्तीकडून या अभिनेत्रीला सातत्यानं अश्लील खेळणी आणि अंडरगार्मेंट्स पाठवण्यात येत आहेत. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीनं पोलिसांना आपल्याला आतापर्यंत 8 वेळा अशा प्रकारच्या भेटवस्तू आल्याचं सांगितलं. एक- दोनदा तिनं याकडे लक्ष दिलं नाही. पण, हे सत्र सुरुच राहिलं. अखेर तिनं पोलिसांत धाव घेतली. अंबोली पोलीस स्थानकात तिनं तक्रार केली असून, सदर प्रकरणी तातडीनं तपास सुरु करण्यात आला आहे. 

अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर अज्ञात इसमाच्या नावे भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 509 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. परंतु अद्याही त्या व्यक्तीचा शोध लागलेला नाही. काही मोबाईल क्रमांक हाती आले असून, आता त्या पुराव्यावरुनच पुढील तपास सुरु असल्याचं कळत आहे.