)
The Ba***ds of Bollywood : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शन क्षेत्रात उतरला असून त्याची पहिली वेब सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ सध्या नेटफ्लिक्सवर आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. चित्रपटाची कथा आणि बॉलिवूडच्या तडाक्यामुळे ही सीरिज मोठ्या प्रमाणात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मात्र, या सीरिजच्या खास स्क्रीनिंगमध्ये संपूर्ण लाईमलाइट वेगळ्याच व्यक्तीकडे वळली. ती म्हणजे खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रजत बेदी यांची मुलगी वेरा बेदी.
रजत बेदी आपल्या पत्नी मोनालिसा, मुलगा विवान आणि मुलगी वेरासह ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ च्या स्क्रीनिंगला उपस्थित होता. संपूर्ण कुटुंबाने पॅपराझींसमोर पोज दिल्या. मात्र, सर्वांच्या नजरा खिळल्या त्या 18 वर्षांच्या वेरा बेदीकडे. काळ्या रंगाच्या टॉप आणि पँटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तिचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
वेराचे फोटो पाहून अनेक युजर्सनी तिची तुलना तरुण करीना कपूरशी केली आहे. वेराचा चेहरा, तिचे हास्य आणि हेअरस्टाईल अगदी करीना कपूरच्या सुरुवातीच्या काळातील लुकची आठवण करून देत असल्याचे चाहते म्हणत आहेत. तर काहींना तिच्या स्मितहास्यात अभिनेत्री प्रीती जिंटाची झलक दिसत आहे असं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर सध्या वेराच्या सौंदर्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक चाहते लवकरच तिला बॉलिवूडमध्ये पाहण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. दरम्यान, सीरिजमधील रजत बेदीच्या भूमिकेचाही चांगला बोलबाला आहे. मात्र त्याच्या कुटुंबातील वेरा हिने आपल्या मासूमियत आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
वेरा बेदीचा जन्म 12 फेब्रुवारी 2007 रोजी झाला असून ती सध्या फक्त 18 वर्षांची आहे. सध्या ती शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. तिचे इन्स्टाग्रामवर अकाउंट प्रायव्हेट आहे. तिचे इन्स्टाग्रामवर सध्या 1082 फॉलोअर्स असून ती स्वतः 609 लोकांना फॉलो करते.
FAQ
आर्यन खानची पहिली वेब सीरिज काय आहे आणि कधी रिलीज झाली?
आर्यन खानची पहिली वेब सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ (The Ba***ds of Bollywood) ही सॅटायरीकल अॅक्शन कॉमेडी आहे, जी नेटफ्लिक्सवर १८ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झाली. ही सीरिज आर्यनने दिग्दर्शित केली असून, ती रेड चिलीज एंटरटेनमेंटद्वारे प्रोड्यूस केली आहे.
सीरिजची कथा काय आहे?
सीरिज एका महत्वाकांक्षी बाहेरच्या व्यक्ती आणि त्याच्या मित्रांच्या बॉलीवूडमधील थरारक, ग्लॅमरस पण अनिश्चित जगातील प्रवासावर आधारित आहे. ती इंडस्ट्रीतील नेपोटिझम, सेलिब्रिटी कॅमिओज आणि हायपोक्रिसीवर व्यंग्य करते, ज्यात सेल्फ-अवेअर ह्युमर आणि लार्जर-दॅन-लाइफ कॅरेक्टर्स आहेत.
सीरिजमधील प्रमुख कलाकार कोण आहेत?
प्रमुख भूमिकांमध्ये बॉबी देओल, लक्ष्य, राघव जुएल, साहेर बंबा, अरशद वर्सी, अन्या सिंग आणि मनोज पहवा आहेत. राजत बेदी यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे.