मुंबई : कोरोना व्हायरसमुळे गेल्या दोन महिन्यांपासून भारतात लॉकडाऊन आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा दरदिवशी वाढतोच आहे. बॉलिवूडमध्येही कोरोनाने शिरकाव केला असून कलाकार, त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आता चित्रपटसृष्टीतील निर्माते बोनी कपूर यांच्या घरातील काम करणारा एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, बोनी कपूर यांच्या लोखंडवाला स्थित घरात काम करणारा 23 वर्षीय नोकराची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काम करणारा हा तरुण गेल्या शनिवारी आजारी होता. त्यानंतर बोनी कपूर यांनी त्याला टेस्ट करण्याचं सांगितलं होतं. त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. टेस्टचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या सोसायटी आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर बीएमसी आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडून त्या तरुणाला क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आलं.


संपूर्ण कुटुंबासह अभिनेता क्वारंटाईनमध्ये


'मी, माझी मुलं आणि घरातील इतर स्टाफ यांना कोणालाही कोणतीचं लक्षणं नाहीत. शिवाय घरातील कोणताच सदस्य लॉकडाऊन झाल्यापासून घरातून बाहेर गेला नाही' असंही बोनी कपूर यांनी सांगितलंय.


लॉकडाऊनमुळे अडकलेला अभिनेता तब्बल दोन महिन्यांनी परततोय घरी


महाराष्ट्र सरकार आणि बीएमसीने या संपूर्ण परिस्थितीत त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल बोनी कपूर यांनी राज्य सरकार आणि बीएमसीचे आभार मानले आहेत. बीएमसीकडून, त्यांच्या वैद्यकीय पथकाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं आणि सल्ल्याचं काळजीपूर्वक पालन करु असंही बोनी कपूर म्हणाले. त्यांच्या घरात काम करणारा व्यक्ती लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा घरी येईल अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


बेरोजगार टीव्ही अभिनेत्याची आत्महत्या; कोरोनाच्या संशयाने शेजाऱ्यांनी मदत करायचे टाळले