मुंबई : अक्षय कुमार स्टारर गोल्ड सिनेमा प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. गोल्डच्या ओपनिंग कमाईचा विचार करता हा तिसरा सर्वात मोठा सिनेमा ठरला आहे. बॉलिवूड ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शनुसार, गोल्ड सिनेमाने पहिल्या दिवशी 25.25 कोटींचा गल्ला केला. सर्वाधिक कमाईच्या यादीत संजू सिनेमा अग्रस्थानी असून रेस 3 दुसऱ्या क्रमांकावर आहे. बागी 2 ला तिसरे स्थान मिळाले आहे. तर गोल्ड सोबतच प्रदर्शित झालेला सत्यमेव जयते ने पहिल्या दिवशी 20.52 कोटींची कमाई करत पाचवे स्थान पटकावले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोल्डचे आतापर्यंतची कमाई 25.25 कोटी रुपये आहे. गुरुवारी या सिनेमाने 8 कोटींची कमाई केली. त्यानंतर कमाईची गती काहीशी मंदावली. याचे कारण पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे निधन असल्याचे म्हटले जात आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा कमाईच्या वेगाला गती आली. आतापर्यंत गोल्ड सिनेमाने एकूण 43.25 कोटींची कमाई केली आहे.


गोल्डसोबत प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयते सिनेमाने 33.50 कोटींची कमाई केली. गोल्डच्या तुलनेत सत्यमेव जयते १० कोटींनी मागे आहे. पण विकेंड अजूनही बाकी आहे. त्यामुळे आता कमाईची गणितं बदलणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 



गोल्ड हा सिनेमा हॉकी कोच बलबीर सिंगच्या जीवनावर आधारीत आहे. ज्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासाठी हॉकीचे पहिले सुवर्णपदक मिळवले. सिनेमात अक्षय कुमार आणि मौनी रॉय प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमातून टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रीमा कागती यांनी केले आहे.