Burj Khalifa inside details: भारतात सर्वात श्रीमंत व्यक्तींचा उल्लेख होतो तेव्हा सातत्यानं समोर येणारं एक नाव म्हणजे मुकेश अंबानी. पण, 'साऊथचे अंबानी' कोण माहितीये? या व्यक्तीकडेही प्रचंड श्रीमंती आहे. इतकी, की त्यांनी चक्क दुबईत असणाऱ्या बुर्ज खलिफामध्येही घर घेतलं आहे. लक्षात येतंय का, या व्यक्तीचं नाव?
बुर्ज खलिफा, ही इमारत जगभरात चर्चेचा विषय आहे. या इमारतीचं नाव खलिफा बिन जायद अल नाहयान (Khalifa bin Zayed Al Nahyan) यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलं आहे. ही इमारत फक्त तिच्या सौंदर्यासाठी नव्हे, तर दुबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणूनही ओळखली जाते. अशा या इमारतीत दक्षिणेकडील अंबानी म्हणून लोकप्रिय असणाऱ्या एका अभिनेत्याचं घरही आहे.
दक्षिणेकडील प्रामुख्यानं मल्याळम चित्रपट जगतामध्ये वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेते मोहनलाल यांनाच 'साऊथचे अंबानी' म्हणून ओळखलं जातं. या इमारतीच्या 29 व्या मजल्यावर मोहनलाल यांचं आलिशान घर असून, ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. अभिनयासोबतच मोहनलाल निर्मिती, गायन आणि व्यवसाय क्षेत्रातसुद्धा सक्रिय आहेत. 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या मोहनलाल यांना राष्ट्रीय पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे. उपलब्ध अहवालांनुसार त्यांचं वार्षिक उत्पन्न 410- 450 कोटी रुपये इतकं आहे. फक्त मोहनलालच नव्हे, तर शाहरुख खानसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचीही बुर्ज खलिफामध्ये गुंतवणूक आहे.
दुबईतील ही आलिशान इमारत 2010 पासून सामान्यांसाठी खुली करण्यात आली. या इमारतीमध्ये घरं, रेस्तराँ आणि हॉटेलंसुद्धा आहेत. मात्र, तिथं एका दिवसाच्या मुक्कामासाठी मोजली जाणारी रक्कम काही कमी नाही. लाखो आणि कोट्यवधींमध्ये हा खर्च जातो. या इमारतीत वरून जर दुबई शहराचं दृश्य पाहायसं असेल तर 124-125 व्या मजल्यावर जाता येतं. जिथलं तिकीट साधारण 3500 ते 5000 रुपयांदरम्यान येतं असं म्हणतात. जर VIP ट्रीटमेंट हवीय, तर 148 व्या मजल्यावर जाण्याचीही मुभा असते. ज्याचा खर्च 9 ते 12 हजार रुपये इतका आहे.
बुर्ज खलिफामध्ये दर दिवशी 9.4 लाख लीटर पाणीपुरवठा केला जातो. तर या इमारतीमध्ये 57 हाय स्पीड लिफ्ट आहेत. ज्यामध्ये जगातील सर्वात उंच लिफ्ट सर्विसचाही समावेश आहे, जी 5000 किलोपर्यंत वजन उचलू शकते. दरवर्षी फक्त पर्यटकांना तिकीट विक्री करूनच बुर्ज खलिफा 621 मिलियन डॉलर म्हणजेच 5,154 कोटी रुपये इतकी कमाई करतं. अशा या भन्नाट इमारतीमध्ये अनेकांच्याच आवडीच्या अभिनेत्याचं अपार्टमेंट असणं ही बाब कमाल आहे ना?
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
RR
(11 ov) 150/3
|
VS |
MI
123/9(11 ov)
|
| Rajasthan Royals beat Mumbai Indians by 27 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.