ड्रेसवर 1 महिन्याची मेहनत अन् रेड कार्पेटवर हॉट अंदाजात दिसली नॅन्सी, प्रियांका चोप्राशी खास कनेक्शन!

Cannes Film Festival Nancy Tyagi :  नॅन्सी त्यागीच्या कान्समधील लूकनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... 

दिक्षा पाटील | Updated: May 18, 2025, 05:41 PM IST
ड्रेसवर 1 महिन्याची मेहनत अन् रेड कार्पेटवर हॉट अंदाजात दिसली नॅन्सी, प्रियांका चोप्राशी खास कनेक्शन!
(Photo Credit : Social Media)

Cannes Film Festival Nancy Tyagi : फ्रान्समध्ये असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बागपतच्या बरनावातील मुलगी नॅन्सी त्यागीनं पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. फॅशन डिझायनर नॅन्सीनं रेड कार्पेटवर स्वत: डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. गेल्या वर्षीचा गुलाबा रंगाचा तिचा ड्रेस खूप चर्चेत आहे. नॅन्सी म्हणाली की इथे माझं आयुष्य बदललं. यावेळी उत्साह वाढला. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नॅन्सी ही दुसऱ्यांदा पोहोचली होती. यावेळी तिनं आणखी हटके स्टाईलचे कपडे शिवले आहेत आणि तिनं स्वत: स्टाईल देखील केले आहेत. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नॅन्सीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमध्ये तिनं परिधान केलेल्या या ड्रेसनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी देखील तिनं गुलाबी रंगाची शेड असलेला आणि फ्रिल डिझाइन असलेला ड्रेस परिधान केला. तर दुसऱ्या दिवशीचा तिचा लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. नॅन्सीनं खूप हॉट आणि ब्यूटीफुल क्रिस्टल-पर्ल ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस परिधान करून ती दुसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर तिनं एन्ट्री केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nancy Tyagi (@nancytyagi___)

नॅन्सीनं दुसऱ्या दिवशी जो ड्रेस परिधान केला तो बनवायला तिला 1 महिन्याचा काळ लागला. डा ड्रेस बनवण्यासाठी नॅन्सीनं कसं जुगाड केलं त्याविषयी तिनं सांगितलं आहे. नॅन्सीनं क्रिस्टलनं बनवलेला हा मिनी ड्रेस परिधान केला. तर रेड कार्पेटवर दुसऱ्या दिवशी दिसली. या ड्रेससोबत तिनं लॉन्ग ट्रेल बनवली होती. पण लॉन्ग ट्रेलवर बॅन आणल्यानंतर त्याला ट्विस्ट करत तिनं ओव्हरकोड म्हणून त्याला कॅरी केलं. तर यासोबत नॅन्सीनं सिल्वर एम्बेलिशमेंट असलेली स्टायलिश बॅग कॅरी केली होती. त्यासोबत शाइनी हील्स तिनं घातल्या होत्या. तिच्या या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले. 

हेही वाचा : ‘देवदूत आहेत नाना पाटेकर'; विधवा महिलांना करतात मदत, मराठवाडा-लातूरकरांनी दिलंय देवाचं स्थान!

हे फोटो शेअर करत नॅन्सीनं कॅप्शन दिलं की 'हा रंग माझ्या आईचा आवडता आहे. या ड्रेसला बनवण्यासाठी एक महिना लागला आणि मी अखेरपर्यंत तयारीत राहिलो. कारण ड्रेस खूपच हेवी होता. त्यामुळे मनापासून आभार. त्या सगळ्यांचे आभार जे या प्रवासाचा भाग राहिले. तुमच्या सगळ्यांशिवाय हा क्षण पुन्हा एकदा इतका स्पेशल होणं शक्य नव्हतं.' दरम्यान, नॅन्सी ही प्रियांका चोप्राची पर्सनल स्टायलिस्ट असल्याचं म्हटलं जातं. तर तिनं अनन्या पांडेसाठी देखील ड्रेस डिझाइन केला होता.