Sushant Singh Rajput : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात एक शनिवारी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी ही CBI करत होते. त्यांनी त्यांची क्लोजर रिपोर्ट सादर केली आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास आता बंद करण्यात आलेला आहे. सीबीआयनं म्हटलं की अभिनेता सुशांतच्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारची शंकेची गोष्ट नाही. त्यांनी यावेळी सांगितलं की क्लोजर रिपोर्टमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या कुटुंबावर सुशांत सिंह राजपुतच्या कुटुंबानं त्यांच्या मुलानं आत्महत्या करण्यासाठी प्रेरित केल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर त्यांनी रिया चक्रवर्तीच्या कुटुंबावर सुशांतच्या पैशाचा वापर केल्याचा आरोप केला. पण रिपोर्टमध्ये हे समोर आलं की त्यानं स्वत:चं इतकं मोठं पाऊल उचलतं आत्महत्या केली.
सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू 14 जून 2020 रोजी झाला. त्याचं मृत शरीर हे मुंबईतील घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले होते. सुरुवातीला आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात होती, पण नंतर हत्या असू शकते असा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयला तपासाची जबाबदारी देण्यात आली होती आणि जवळपास पाच वर्षांनी सीबीआयनं आता क्लोजर रिपोर्ट सादर केली आहे. सीबीआयनं कोर्टात हे रिपोर्ट सादर केले आहेत. आता कोर्टानं ठरवायचं आहे की, या रिपोर्टला मान्यता दिली जाईल की पुढील तपास करण्याचा आदेश दिला जाईल. सीबीआयनं बिहार पोलिसांच्या हातातून हा तपास घेतला होता. सुशांतच्या वडिलांनी पटणात दिलेल्या तक्रारीवर आत्महत्येसाठी प्रेरित केल्याचा गुन्हा दाखल केला होता. सीबीआयनं एम्सच्या फोरेंसिक तज्ञांच्या मदतीने विष आणि गळा दाबल्याचे आरोप नाकारले होते. सीबीआयनं रिया चक्रवर्ती आणि तिच्या आणि सुशांतच्या जवळच्या लोकांचे जबाब नोंदवले. त्यानंतर त्याचे मेडिकल रिपोर्ट तपासले.
सुशांतच्या वडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारित त्यांनी म्हटलं होतं की रियानं तिच्या कुटुंबातील लोकांसोबत त्याच्या पैशांचा वापर केला. तर रियानं या सगळ्या आरोपांवर प्रतिक्रिया देत सांगितलं की हे खोटं आहे. रियासोबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची देखील चर्चा झाली होती. रियाला जवळपास महिनाभर तुरुंगात रहावं लागलं होतं.
हेही वाचा : ऐश्वर्या 'हे' बोलताच घाबरतो अभिषेक बच्चन; म्हणाला, 'तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही...'
सुशांतच्या कामाविषयी बोलायचं झालं तर 'किस देश में है मेरा दिल' या मालिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्याला खरी ओळख ही 'पवित्र रिश्ता' या शोमधून मिळाली होती. त्यानं याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं. त्यात 'काई पो चे', 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'शुद्ध देसी रोमांस', 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी!', 'केदारनाथ', 'छिछोरे' आणि 'दिल बेचारा' अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यानं काम केले. 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटानं त्याला सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळाली.