Chitrangada Singh: या अभिनेत्रीने नुकतेच सिनेसृष्टीत 20 वर्षांचा प्रवास पुर्ण केला आहे. या 20 वर्षांनिमित्त तिने एका मुलाखतीत देखील सांगितले. तिने अनेक संधी गमावल्या. तिच्या हातून अनेक मोठमोठे प्रोजेक्ट गेले आहेत. ही अभिनेत्री आहे चित्रंगदा सिंग. चित्रांगदा सिंहने तिच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे लक्ष वेधले. प्रत्येक पात्र अगदी मनापासून पार पाडते. अलीकडेचं ती 'हाऊसफुल 5'मध्ये झळकली होती. मात्र, चित्रपटातील तिची भूमिका तितकीशी मजबूत वाटली नाही. तिच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त तिने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनुभव मोकळेपणाने शेअर केले.
20 वर्षांचा प्रवास
एका मुलाखतीत चित्रांगदाने तिच्या प्रवासाविषयी सांगितले, 'हजारों ख्वाहिशें ऐसी' या चित्रपटातून मी सुरुवात केली आणि हे 20 वर्ष कधी गेले, कळलेही नाही. मी फार मोठ्या अपेक्षांनिशी इंडस्ट्रीमध्ये आले नव्हते, पण जे काही मिळवले, त्याबद्दल मी समाधानी आहे.'
फक्त 11 वर्षे सक्रिय काम
ती पुढे म्हणाली, 'या 20 वर्षांत मी 9 वर्षांचा ब्रेक घेतला होता. म्हणजे मी फक्त 11 वर्षे सक्रियपणे काम केलं आणि तरीही लोकं मला विसरले नाहीत. याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे.'
'हजारों ख्वाहिशें ऐसी'सारखा सिनेमा पुन्हा बनावावा
चित्रांगदाला वाटते की आजही अशा आशयघन चित्रपटांची गरज आहे. 'सिनेमा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसावा. समाजावर प्रभाव टाकणाऱ्या विषयांवर चित्रपट बनवायला हवेत,' असं ती म्हणाली.
हे ही वाचा: 'अनुपमा' मालिकेच्या सेटला लागली आग, संपूर्ण सेटच जळून खाक
चित्रांगदाने नाकारलेले सिनेमे
मुलाखतीत चित्रांगदाने सांगितले की काही चुकांमुळे ती काही मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग होऊ शकली नाही. ''गँगस्टर', 'तनु वेड्स मनु', 'मंगल पांडे'मध्ये अमीषा पटेलने साकारलेली भूमिका आणि शाहरुख खानचा 'चलते चलते' हे सर्व प्रोजेक्ट्स मला ऑफर झाले होते, पण मी ते नाकारले,' असे ती म्हणाली.
शाहरुख खानशी झालेली चर्चा
''चलते चलते'च्या वेळी काही अडचणी आल्या होत्या आणि कास्टिंग पटकन करावं लागलं. शाहरुखने स्वतः माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. सईद मिर्झा आणि जुही चावलाचा भाऊ बॉबी माझा संपर्क शोधत होते. पण मी त्या वेळी उपलब्ध नव्हते. नंतर जेव्हा मी शाहरुखसोबत एका जाहिरातीत काम केलं, तेव्हा त्याने ही गोष्ट मला सांगितली,' असं चित्रांगदाने शेवटी सांगितलं.
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
AUS
(70.3 ov) 225 (37 ov) 121
|
VS |
WI
143(52.1 ov) 27(14.3 ov)
|
Australia beat West Indies by 176 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.