Ghanshyam Darwade on His Health: घनश्याम दरोडेला जन्मापासूनच अनेक आजार. एका मुलाखतीत खुलासा करताना घनश्याम भावूक.

Ghanshyam Darwade on His Health: घनश्याम दरोडे बिग बॉस मराठीमधून प्रसिद्धी मिळाली आहे. ज्याला सर्वजण छोटा पुढारी म्हणून ओळखतो. बिग बॉसमध्ये जाण्यापासून ते आतापर्यंत तो नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या मृत्यूच्या खोट्या अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर घनश्याम दरोडेने आपल्या स्पष्टवक्तेपणातून अफवांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, अलीकडेच एका मुलाखतीत त्याने आपल्या शारीरिक संघर्षाबाबत आणि आजारपणाशी चाललेल्या झुंजीबाबत अत्यंत भावनिक खुलासा केला आहे.
घनश्याम म्हणाला की, माझं बालपण हॉस्पिटलमध्येच गेलं आहे. मी सहा वर्षांचा होईपर्यंत कायम हॉस्पिटलमध्ये होतो. मला जन्मतःच काही शारीरिक त्रास होते. लिव्हर आणि किडनीचे आजार होते आणि अजूनही आहेत. माझी उंची कमी असल्यामुळे गावी मला नेहमी डावललं जायचं. पण या सगळ्यांवर मात करत मी पुढे आलो. उंचीवरून अनेकदा त्याला ट्रोल देखील केलं.
अनेक आजारांशी झुंज देत घनश्याम बनला सेलिब्रिटी
मी जेव्हा सातवीत होतो तेव्हा माझ्या आजाराबाबत मला माहिती झालं. माझ्या वयाच्या मुलांची उंची वाढत होती पण माझी नव्हती. त्यामुळे मी आई-वडिलांना नेहमी याबाबत विचारायचो. त्यावेळी ते काहीही स्पष्ट सांगत नव्हते. शेवटी माझी सहनशक्ती संपली आणि मी थेट डॉक्टरांनाच विचारलं. त्यावेळी डॉक्टरांनी मला सांगितले की, मला आनुवंशिक आजार, थायरॉईड, लिव्हर व फुफ्फुसांची सूज आणि क्रिएटिनचा त्रास आहे. माझं रक्त शुद्ध होत नाही. त्यामुळे अजूनही मला नियमितपणे इंजेक्शन घ्यावे लागतात असं घनश्याम दरोडेने सांगितले.
पुढे म्हणलाा की, समाजाने मला स्वीकारलं नसलं तरी माझ्या आई-वडिलांनी मला कायम साथ दिली. मी जे काही आज आहे ते फक्त त्यांच्या मायेने आणि विश्वासाने आहे. असं सांगताना घनश्याम दरोडे अतिशय भावूक झाला. शारीरिक उंचीवरून अनेकदा ट्रोल झालेला घनःश्याम आज मनोरंजन क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण करत आहे. फक्त बिग बॉस नव्हे तर विविध मुलाखती, व्हिडीओ आणि कार्यक्रमांतून तो आपली मतं ठामपणे मांडतो. त्याचा आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.