नथुराम गोडसे साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या अडचणींत वाढ, त्यांचं म्हणणं ऐकलं?
पाहा नेमका वाद काय ...
मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार आणि कला जगताकडून सक्रीय राजकारणाकडे वळलेल्या अमोल कोल्हे यांच्या नावानं आता नव्या वादाला वाचा फोडली जात आहे. कोल्हे यांनी 'वाय आय किल्ड गांधी' (why i killed gandhi)या चित्रपटात साकारलेली नथुराम गोडसे यांची भूमिका या वादाचा मुळ मुद्दा ठरत आहे. (Amol kolhe)
राष्ट्रवादी पक्षातून खासदार पदावर असणाऱ्या कोल्हे यांना ते ही भूमिका स्वीतकारून साकारू कसे शकतात, असा बोचरा सवाल सध्या त्यांना विचारला जात आहे.
अचानक चित्रपट प्रदर्शित होतोय आणि...
अमोल कोल्हे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीदरम्यान, 2014 ते 2016 या काळात शिवसेनेतून राजकीय खेळी केली. पण, यानंतर मात्र ते कला क्षेत्रात सक्रिय दिसले.
पुढे 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत जात नव्यानं खिंड लढवण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळातच त्यांनी हा चित्रपट केला होता.
किंबहुना 2017 मध्ये चित्रीकरण झालेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावरूनही काही वाद होते. अखेर हा चित्रपट अचानकच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत आली.
मुळात आपण कधीच गांधी हत्येचं समर्थन केलं नाही. शिवाय गोडसेंच्या उद्दातीकरणाचा प्रश्नच येत नाही. एक कलाकार म्हणून ही भूमिका स्वीकारल्याचं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं.
एखादी भूमिका साकारल्यानं तो माणूस तसा होतो का, असा सवाल मांडत त्यांनी कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, तसंच एक व्यक्ती म्हणून वैचारि स्वातंत्र्याचा आदर झाला पाहिजे असं त्यांनी विरोधकांना सुनावलं.
चित्रपटाच्या मुद्द्यावरून उगाच वाद नको, असं म्हणत त्यांनी आपण हा चित्रपट स्वीकारला तेव्हा राष्ट्रवादीत नव्हतो हा मुद्दा प्रकर्षानं अधोरेखित केला.