ड्रेसच्या मोठ्या गळ्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला स्टाईल आयकॉन म्हटलं जातं

Updated: Dec 2, 2021, 08:47 PM IST
ड्रेसच्या मोठ्या गळ्यामुळे दीपिका पदुकोण ट्रोल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला स्टाईल आयकॉन म्हटलं जातं. पण कधी-कधी ती स्टायलिश बनण्याच्या नादात ओप्स मोमेंटची शिकारही होते. दीपिका पदुकोण तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी जरा जास्तच बोल्ड झाली आणि परिणामी तिला तिचा ड्रेस पुन्हा पुन्हा सांभाळावा लागला.

दीपिकाचा ड्रेस
दीपिका पदुकोणने 2017 मध्ये एक हॉलिवूड चित्रपट केला.  या चित्रपटात अभिनेत्रीने अप्रतिम अभिनय केला आणि परदेशातही तिचे कौतुक झालं. मात्र या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने बोल्ड ड्रेस परिधान केला होता. भारतातच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अभिनेत्रीने गोल्डन कलरचा गाऊन घातला होता. जो मागून बॅकलेस होता आणि तिचा गळा समोरून खूप खोल होता. हा पोशाख परिधान करून ती फारशी कम्फर्टेबल दिसत नव्हती.

सर्वात बोल्ड ड्रेस
या आउटफिटमध्ये दीपिका पदुकोण खूपच बोल्ड दिसत होती. मात्र हा लूक तिच्यावर खूप जास्त वजनाचा होता. अभिनेत्रीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या आउटफिटमुळे ती ट्रोलही झाली होती. दीपिकाच्या आत्तापर्यंतच्या आउटफिटबद्दल बोलायचं झालं तर हा तिचा सर्वात बोल्ड आउटफिट होता.