धर्मेंद्र यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीप्रकरणी दिल्ली कोर्टाने बजावले समन्स, काय आहे प्रकरण?

Delhi Court Issues Summons Against Dharmendra: बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना कोर्टाने समन्स बजावले आहेत. काय आहे प्रकरण? जाणून घेऊया.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 10, 2024, 10:11 AM IST
धर्मेंद्र यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीप्रकरणी दिल्ली कोर्टाने बजावले समन्स, काय आहे प्रकरण? title=
Delhi Patiyala Court Summons Actor Dharmendra over cheating case of Garam Dharam Dhaba

Delhi Court Issues Summons Against Dharmendra: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र यांना दिल्ली कोर्टाने समन्स बजावले आहेत. फसवणुकीप्रकरणी धर्मेंद्रसह दोघांना समन्स बजावण्यात आले आहे. ज्युडिशियल मजिस्ट्रेट यशदीप चहल यांनी समन्स जारी केले असून दिल्लीचे व्यापारी सुशील कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर कोर्टाने दखल घेतली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 'गरम धरम ढाबा'प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप धर्मेंद्र यांच्यावर करण्यात येत आहे. फ्रँचायझीमध्ये गुंतवणुकीच्या नावाने फसवणुकीचा आरोप आहे. धर्मेंद्र यांच्यासह आणखी दोन व्यक्तींनाही कोर्टाच हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयपीसी कलम 506 अंतर्गंत गुन्हेगारी धमकीच्या गुन्ह्यासाठी देखील समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी 20 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. कोर्टाने म्हटलं आहे की, न्यायालयाने या प्रकरणाची प्रथमदर्शनी तपासणी करणे आवश्यक आहे.

9 ऑक्टोबर 2020 रोजी कोर्टाने या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देणारी एक याचिका फेटाळली होती. कोर्टाने तक्रारदाराला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. तक्रारदार सुशील कुमार यांच्यावतीने अधिवक्ता डीडी पांडे कोर्टात हजर राहिले होते. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

एप्रिल 2018 मध्ये सहआरोपींनी त्याला धरमच्या वतीने NH-24/NH-9, उत्तर प्रदेश वर गरम धरम ढाब्याची फ्रँचायझी उघडण्याची ऑफर देऊन संपर्क साधला होता. तक्रारदाराला कनॉट प्लेस, दिल्ली आणि मुर्थल, हरियाणा येथील गरम धरम ढाब्याच्या शाखांमधून सुमारे 70 ते 80 लाख रुपयांची मासिक उलाढाल होत असल्याच्या बहाण्याने फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले. 

तक्रारदाराला सांगितले की गुंतवणुकीवर सात टक्के नफ्यावर 41 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसंच, फ्रेंचाइजी सुरू करण्यासाठी संपूर्ण मदत केली जाईल, असं अश्वासनदेखील केले. या प्रकरणी सह आरोपी आणि तक्रारदार यांच्यात अनेक ई-मेल आणि मिटिंग्सदेखील झाल्या. कनॉट प्लेसमध्ये गरम धरम ढाबाचे ब्राँच ऑफिमध्ये तक्रारदार आणि त्यांच्या व्यापाऱ्यांमध्ये एक मिटिंगदेखील झाली होती.