मुंबई : 'देवों के देव महादेव' या मालिकेत भगवान शंकराची भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैनाने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लग्न केलं. अभिनेत्याने सोशल मीडियावर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. या फोटोंसोबत मोहित रैनाने एक मोठी पोस्ट देखील लिहिली आहे ज्यामध्ये त्याने आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाचे फोटो शेअर करत मोहित रैनाने पोस्टमध्ये लिहिलं की, 'प्रेम कोणताही अडथळा ओळखत नाही, ते अडथळे दूर करतं. उडी मारतं, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी भिंतीतून उडी मारतं. त्या आशेने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने आपण आता दोघं नाही तर एक आहोत. या नवीन प्रवासात तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे. अदिती आणि मोहित.



दोघांनी एकमेकांचा हात धरला
मोहितने शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये अभिनेता पत्नीसोबत लग्न मंडपात दिसत आहेत तर काही फोटोंमध्ये दोघंही लग्नानंतर एकमेकांसोबत पोज देताना दिसत होते.