'धडक'चा चित्रीकरणादरम्यानचा फोटो केला शेअर...

निर्माता करण जोहरच्या आगमी चित्रपटातून अभिनेत्री श्रीदेवी हिची मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 16, 2017, 05:32 PM IST
'धडक'चा चित्रीकरणादरम्यानचा फोटो केला शेअर...

 मुंबई : निर्माता करण जोहरच्या आगमी चित्रपटातून अभिनेत्री श्रीदेवी हिची मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

 सैराटचा रिमेक

धडक असे चित्रपटाचे नाव असून हा मराठी चित्रपट सैराटचा रिमेक असणार आहे. या चित्रपटाचे शूटींग राजस्थान येथील जयपूर येथे सुरू आहे. 

फोटो शेअर केला 

 चित्रिकरणादरम्यानचा एक फोटो करणने शेअर केला आहे. यात जान्हवी, ईशान एका बंदुकीसह दिसत आहेत. करणने फोटो शेअर करताना लिहीले की, धडकमधील जान्हवी आणि ईशान. चित्रिकरण लवकर पुढे जात आहे. 

चित्रपटाबद्दल...

मराठीत सैराट अत्यंत लोकप्रिय ठरला. त्याने सर्व रेकॉर्ड तोडले. हिंदीत होणाऱ्या रिमेकची कथा काहीशी वेगळी आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू असून त्या दरम्यानचे फोटोज सातत्याने समोर येत आहेत.
हा चित्रपट ६ जुलै २०१८ मध्ये प्रदर्शित होणार असून चित्रपटाबद्दल प्रेक्षक अत्यंत उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करत आहेत.