अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक धनंजय पोवार उर्फ डीपी दादाने सोशल मीडियावर सागर कारंडेचा बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
धनंजय पोवारने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना डीपीने सुरुवातीला, 'मी काय दाखवतोय ते फक्त बघा, मला शंका आहे,' असं म्हणत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. पुढे तो म्हणतो, 'सागर दादा नेमकं काय करतोय ते कळत नाही. सागर हात बडवत आहे. जे काम तंबाखू खाणारा माणूस करतो, ते सगळं इथे निदर्शनास येतंय. आता बघा, त्यातला कचरा टाकला आणि लगेच हात मागे घेतला. त्याच्या पाठीमागे जे दिसतंय, ती कदाचित तंबाखूची पुडी असू शकते,' असा दावा डीपीने केला आहे.
डीपी पुढे असंही म्हणतो की, 'सागर वैष्णव म्हणून ओळखला जातो. हा व्हिडीओ मी शेअर करतोय, खरं-खोटं तुम्हीच ठरवा. मला फक्त शंका वाटतेय.' व्हिडीओ शेअर करताना डीपीने “'ब्दच नाहीत… सागर भाऊ, मळ डबल' अशी कॅप्शन दिली असून, त्यावरूनही चर्चेला अधिक उधाण आलं आहे.
धनंजय पोवारने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सागर कारंडे बिग बॉसच्या घरातील बाथरूममध्ये उभा असल्याचं दिसत आहे. त्याच वेळी राधा आणि अनुश्री तिथे येतात. हा व्हिडीओ ‘बिग बॉस मराठी ६’च्या ११व्या भागातील असल्याचं सांगितलं जात आहे. राधा बाथरूममध्ये येताच सागर कारंडे, ज्येष्ठ अभिनेते निळू फुलेंच्या आवाजाची नक्कल करत तिच्याशी संवाद साधतो आणि तिची मस्करी करतो. मात्र, राधाशी बोलताना सागरचा एक हात सतत मागे दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांच्या मनात शंका अधिकच बळावली आहे.
दरम्यान, या व्हिडीओवरून सागर कारंडे खरंच बिग बॉसच्या घरात तंबाखू मळत होता का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, या संदर्भात सागर कारंडेकडून किंवा बिग बॉसच्या निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या असून, काही जणांनी धनंजय पोवारच्या दाव्याला समर्थन दिलं आहे, तर अनेकांनी सागर कारंडेची बाजू घेत हा केवळ गैरसमज असल्याचं म्हटलं आहे. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ विनोदी पद्धतीने पाहावा, असं मतही व्यक्त केलं आहे.
दरम्यान, हा प्रकार नेमका काय आहे, याबाबत स्पष्टता येण्यासाठी प्रेक्षक आता बिग बॉसच्या आगामी भागांकडे आणि सागर कारंडेच्या प्रतिक्रियेकडे लक्ष ठेवून आहेत.
कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.
...Read More|
IND
(20 ov) 209/9
|
VS |
NAM
116(18.2 ov)
|
| India beat Namibia by 93 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(19.3 ov) 123
|
VS |
ITA
124/0(12.4 ov)
|
| Italy beat Nepal by 10 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SL
(20 ov) 225/5
|
VS |
OMA
120/9(20 ov)
|
| Sri Lanka beat Oman by 105 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.