Dhanush Paternity Case : धनुषचे आई-वडिल नेमके कोण? पेच वाढला
साऊथचा नावाजलेला अभिनेता, तसचे बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या धनुषची चर्चा नेहमीच होत असते. धनुषने दोन्हीही चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट अभिनय करून आपला वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केलाय. सध्या तो एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आलाय. हे प्रकरण इतके वाढले आहे की हा वाद आता मद्रास कोर्टात पोहचलाय.
मुंबई : साऊथचा नावाजलेला अभिनेता, तसचे बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या धनुषची चर्चा नेहमीच होत असते. धनुषने दोन्हीही चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट अभिनय करून आपला वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केलाय. सध्या तो एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आलाय. हे प्रकरण इतके वाढले आहे की हा वाद आता मद्रास कोर्टात पोहचलाय.
काही दिवसांपूर्वी मदुराईच्या असलेल्या आर. काथीरेसन आणि त्यांच्या पत्नी के. मीनाक्षी या जोडप्याने अभिनेता धनुष हा त्यांचा मुलगा असल्याचा दावा केला होता. धनुष हा त्यांचा तिसरा मुलगा आहे, जो चित्रपटात दिसण्यासाठी घरातून पळून गेला होता. धनुषने चुकीचा नमुना चाचणी अहवाल न्यायालयात सादर केल्याचा आरोप कथिरेसन यांनी केला आहे. हे प्रकरण सुमारे 5 वर्षे जुने आहे. या प्रकरणात अभिनेता धनुषला मद्रास उच्च न्यायालयाने समन्स बजावले होते.
आता अभिनेत्याची दाम्पत्याला नोटीस
अभिनेता धनुष आणि त्याचे वडील कस्तुरी राजा यांनी या जोडप्याचे बोलणे फेटाळून लावत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवलीय. ही कायदेशीर नोटीस धनुषच्या वतीने त्याचे वकील एस हाजा मोहिद्दीन गिश्ती यांनी जोडप्याला पाठवली. नोटीसद्वारे दाम्पत्याला धनुषबद्दल अशा खोट्या गोष्टी न सांगण्यास सांगण्यात आलेय.
कायदेशीर नोटीसत काय ?
माझ्या क्लायंटवर तुम्ही खोटे, अक्षम्य आणि बदनामीकारक आरोप करताय, हे आरोप लावणे बंद करा. तुम्ही असे न केल्यास, माझे क्लायंट त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयात जातील. तुम्ही लावलेले खोटे, अक्षम्य आणि बदनामीकारक आरोप त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकतात, ज्यासाठी तुमच्यावर बदनामीचा खटला भरला जाईल, असे जोडप्याला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
दरम्यान आता या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते. याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. तसेच धनुष नेमका कोणाचा मुलगा आहे हे स्पष्ट होणार आहे.