Dashavatar : बॉक्स ऑफिसवर अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसने निर्मित केलेला 'दशावतार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात गावकुसवापासून देवभूमीपर्यंतचा प्रवास सुरु होणार असून परंपरेच्या रंगभूमीवरून उगम पावलेली एक खास कथा प्रेक्षकांना बघायळा मिळणार आहे. 'दशावतार' हा चित्रपट 12 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. कलेवर जीवापाड प्रेम करणारा आणि कोकणच्या लाल मातीतील कलाकाराचा अवतार म्हणजे 'दशावतार'.
या चित्रपटात दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत असणार आहेत. त्यांचे वय 80 वर्षे असून त्यांचा चित्रपटातील नवीन अंदाज हा बघण्यासारखा असणार आहे. त्यांनी चौकट राजा, तात्या विंचू, चिंची चेटकीण, श्रीयुत गंगाधर टिपरे आणि चिमणराव अशा भूमिकांना मालिका, रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावर जिवंत केलं आहे.
दिलीप प्रभावळकरची या चित्रपटातील सर्वात वेगळी भूमिका असणार आहे. त्यामुळे या चित्रपटात तो रसिकांना आश्चर्यचकित करणार आहे. या चित्रपटातील रहस्यमय कथा रसिक प्रेक्षकांच्या मना घर करणार आहे. कधीही अशा अवतारात न पाहिलेल्या दिलीप प्रभावळकर यांची 'दशावतार'मधील भूमिका प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरणार आहे.
50 दिवसांमध्ये चित्रपटाचे शूटिंग पूर्ण
'दशावतार' या चित्रपटाची कथा ही कोकणात घडणाऱ्या कथेवर आधारित असणार आहे. तसेच या चित्रपटाचे शूटिंग हे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी झालं आहे. संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग हे फक्त 50 दिवसांमध्ये झालं आहे. त्यामुळे या चित्रपटात तुम्हाला कोकणातील भव्यतेचा अनुभव मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि लेखन हे सुबोध खानोलकर यांनी केलं आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, सुजय हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, विनायक जोशी आणि संजय दुबे यांनी केलं आहे.
या चित्रपटाची पहिली झलक तुम्हाला लवकरच झी मराठीवर पाहता येणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांना देखील या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता लागली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी आतापर्यंतची सर्वात वेगळी भूमिका या चित्रपटात केली आहे.
ENG
(1 ov) 2/0 (112.3 ov) 387
|
VS |
IND
387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
16/1(9 ov)
|
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.