Diljit Dosanjh Sardar Ji 3: पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'सरदार जी 3' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, त्यात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर झळकताना दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेक प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला असून, काहींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. पण प्रकरण फक्त इतकंच नाही. या चित्रपटात हानिया आमिरसह आणखी तीन पाकिस्तानी कलाकार म्हणजेच नासिर चिन्योती, डॅनियल खावर आणि सलीम अलबेला हे पाकिस्तानी कलाकार असणार आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर चित्रपटावर वाद आणखी गडद झाले आहे.
भारतात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती, जी आजही लागू आहे. या पार्श्वभूमीवर दिलजीत दोसांझसारखा स्टार अशा कलाकारांसोबत काम करत असल्याचे लक्षात आल्यानंतर काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
ट्रेलर यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेला नाही. कारण भारतात हा चित्रपट रिलीज होणार नाही. तरीही, दिलजीतने आपल्या इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेलर शेअर केल्यामुळे तो तरीही प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. ट्रेलरमध्ये भरपूर विनोद, थरार आणि फँटसी शैलीचा अंश दिसून येतो.
चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रीमियर 27 जून 2025 रोजी होणार आहे. त्याचा मुख्य उद्देश कॅनडा, युके, अमेरिका आणि मध्यपूर्वेतील प्रेक्षकांना भुरळ घालणे आहे, जिथे पंजाबी सिनेमाला मोठा प्रेक्षकवर्ग आहे.
चित्रपटाच्या शूटिंगबद्दल बोलायचं झालं, तर त्याचे बहुतांश भाग विदेशात चित्रित करण्यात आले होते. या चित्रपटात भारतीय कायद्याच्या कक्षेबाहेर राहिल्यामुळे पाकिस्तानी कलाकारांचा समावेश शक्य झाला. या प्रकारामुळे भारतात तो थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नसल्याचं स्पष्ट आहे.
हे ही वाचा: 'या' अभिनेत्रीने गमावले सुपरहिट सिनेमे; शाहरुखपासून ते 'तनु वेड्स मनु' पर्यंत अनेक संधी आल्या पण...
एकीकडे काही प्रेक्षकांनी दिलजीतच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचं कौतुक केलं आहे, तर दुसरीकडे राष्ट्रहिताला प्राधान्य द्यायला हवं, असेही सोशल मीडियावर म्हटले जात आहे. यासोबतच हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येईल, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.परंतु, भारतात तो अधिकृतरित्या प्रदर्शित न होऊ शकल्याने अनेक चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
'सरदार जी 3' हा चित्रपट सध्या सीमा पार कलाकारांमुळे निर्माण झालेल्या संवेदनशील वादाचा केंद्रबिंदू बनला आहे. दिलजीत दोसांझचा हा निर्णय पुढे काय परिणाम घडवतो, हे पाहणे रंजक ठरेल.
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
16/1(9 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.