Dipika Kakar Tumor : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री दीपिका कक्कडच्या लिव्हरमध्ये ट्यूमर झाल्याची बातमी काल समोर आली. तिच्या नवऱ्यानं शोएब इब्राहिमनं व्लॉगच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं की दीपिकाच्या पेटात दु:खत होतं आणि जेव्हा टेस्ट केली तेव्हा कळलं की टेन्निसच्या बॉल इतका हा ट्यूमर आहे. आता दीपिकाची नणंद सबानं देखील तिच्या वहिणीच्या आरोग्यावर अपडेट दिली आहे आणि सांगितलं की अल्लाहवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
दीपिकाची नणंद सबाची पुढच्या आठवड्यात डिलीव्हरी होणार आहे. तिनं या व्लॉगमध्ये सांगितलं की 'अल्लावर विश्वास ठेवणं गरजेचं हे. हे मी अशा क्षणी शिकले कारण तुम्ही कितीही रडले, काहीही केलं, काही होत नाही. 2-3 दिवस सगळं काही केलं.'
सबानं सांगितलं की 'त्यावेळी दीपिकाला भेटली नव्हती आणि तिच्या आईनं दीपिकाला कसा त्रास होतोय या विषयी सांगितलं. तेव्हा तिला कळलं की दीपिकाला सीटी स्कॅनसाठी बोलावण्यात आलं आहे. तर ती हा विचार करून लागली की डॉक्टरांनी असं का सांगितलं असेल. सबानं सांगितलं की आम्ही एकमेकांशी चर्चा करत होतो की सीटी स्कॅन का करायला सांगितला असेल? अदगीच साधारण पोट दुखीसाठी का सीटी स्कॅन का सांगताय. सामान्य पोट दुखी असेल तर अल्ट्रासाउंड होतं. त्यात तुम्हाला तर माझी परिस्थिती माहित आहे, तर मी घरीच होते. त्यानंतर अम्मीनं येऊन सांगितलं की नेमकं काय झालं. या गोष्टीचं मला गिल्ट वाटतंय. यावेळी थोड्या काळासाठी मी विसरले की एका बाळासाठी आईचं बोलणं योग्य आहे की नाही.'
दरम्यान, सबाचा नवरा खालिद बोलताना दिसला की सबाची पुढच्या आठवड्यात डिलिव्हरी होणार आहे. त्यामुळे तुम्ही दीपिका आणि सबा दोघांसाठी प्रार्थना करा. त्यानं सांगितलं की जेव्हा सबाला दीपिकाविषयी कळलं तेव्हा ती खूप रडली. तर दीपिका खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यांनी आजपर्यंत तिच्यासारखी स्ट्रॉंग महिला पाहिली नाही. तिनं कधी हे सांगितलं नाही की तिला किती त्रास झाला.
हेही वाचा : 'लग्नानंतर नवऱ्यासोबत एकाच घरात पण वेगळ्या रुममध्ये राहते; आयुष्यात...', लोकप्रिय अभिनेत्रीचा विचित्र खुलासा
सबानं सांगितलं की त्यानं दीपिकाच्या आरोग्याविषयी तिच्यासमोर कोणत्या गोष्टीवर चर्चा केली नाही. तर कायम हसत राहिली आणि रूहानसोबत खेळत राहिली. पण तिला तिच्या बाळाची चिंता आहे. सबानं सांगितलं की ट्यूमरपासून सूटका मिळवण्यासाठी दीपिकाची सर्जरी करणं गरजेचं आहे.