Dipika Kakkar After Surgery : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका कक्कडचे चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दीपिकाची सर्जरीनंचक रिक्वहरी होते. इतकंच नाही तर पहिल्यांदा दीपिका कक्कड चाहत्यांसमोर आली आणि तिनं यासगळ्याविषयी माहिती दिली. या व्हिडीओमध्ये दीपिकानं देखील सांगितलं की तिला अनेक टाके आहेत. खोकल्यामुळे अनेकदा टाक्यांवर प्रेशर येतो आणि त्रास होतो.
दीपिका कक्कडच्या लिवरमध्ये ट्यूमर होता. ज्याचं ऑपरेशन हे 14 तास सुरु होतं. ऑपरेशननंतर दीपिका पहिल्यांदा चाहत्यांसमोर आली आहे आणि त्यांचे आभार. दीपिका सतत तिच्या व्लॉग्सच्या मदतीनं तिच्या चाहत्यांशी बोलताना दिसली. ऑपरेशननंतर दीपिकानं सांगितलं की, 'मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. इथल्या नर्स या खूप चांगल्या आहेत आणि पॉजिटिव्ह आहे. बाकी सगळे लोक देखील खूप चांगले आहेत. मी आता आधीपेक्षा चांगली आहे. मला फक्त तेव्हा त्रास होतो जेव्हा मला खोकला येतो. खोकला आल्यानंतर टाक्यांवर तणाव येतो. मला वाटत नाही की तुमच्याशी मी आता जास्त बोलू शकेन. मी आता तेव्हा बोलेन जेव्हा मी थोडं रिकव्हर करेन.'
शोएब इब्राहिमनं त्याच्या यूट्यूब चॅनवर असलेल्या व्लॉगची सुरुवात दीपिका चालताना आणि सर्जरीनंतर जेवताना पासून दाखवलं आहे. या दरम्यान, व्लॉगमध्ये शोएबनं सांगितलं की त्यांची रिकव्हरी चांगली झाली. खोकल्यामुळे थोडा त्रास झाला. पण आता तो आधीपेक्षा चांगला आहे. सर्जरीनंतर काल रात्री ती आरामात झोपली आणि 3 दिवस दीपिका आयसीयूमध्ये राहिली आणि सतत पॅनिक होत होती. तिच्या नाकात जी ट्यूब होती त्यामुळे ती सतत घाबरत होती.
हेही वाचा : 'आपल्या बहिणीच्या पैशावर जगतोयस'; ट्रोलरला सुष्मिता सेनच्या भावाने दिलं उत्तर, म्हणाला 'माझं...'
दरम्यान, पुढे शोएबनं सांगितलं की इन्फेक्शनची भीती होती. या कारणामुळे डॉक्टरांनी तिच्या जवळ ना मला किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला जाऊ दिलं नाही. जेव्हा तिचा डिस्चार्ज होईल तेव्हा तिची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. कारण इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. दीपिकाला ट्यूमर आहे हे कळण्यापासून ऑपरेशनपर्यंतचा काळ आठवत शोएबनं सांगितलं की आमच्यासाठी हे खूप कठीण होतं. त्यानं सांगितलं की त्याला तो काळ आठवला जेव्हा 2021 मध्ये त्याचे वडील रुग्णालयात दाखल झाले होते. पण सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की हे दोघे आता या फेजमधून बाहेर आले आहेत. आम्ही लोकं या कठीण काळात पॉजिटिव्ह राहणार आहोत. पण एक व्यक्ती असल्यामुळे अनेकदा डोक्यात निगेटिव्ह विचार तर येतातच.