'अजरामर गाण्याची पूर्व वाट लावली', 'दिसला गं बाई दिसला' गाण्याच्या रिमेकवरील गौतमीचा डान्स पाहून चाहते संतप्त

Disla Ga Bai Disla: 'प्रेमाची गोष्ट 2' या चित्रपटात 'दिसला गं बाई दिसला' या गाण्याचं नवीन व्हर्जनवर गौतमी पाटीलचा डान्स पाहून नेटकरी भडकले आहेत.   

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 16, 2025, 04:49 PM IST
'अजरामर गाण्याची पूर्व वाट लावली', 'दिसला गं बाई दिसला' गाण्याच्या रिमेकवरील गौतमीचा डान्स पाहून चाहते संतप्त

Disla Ga Bai Disla : मराठी सिनेसृष्टीने प्रेक्षकांना अनेक अजरामर गाणी दिली आहेत. अगदी ब्लॅक अँड व्हाईट काळातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमठवत आहेत. त्या काळी गाणी रेकॉर्ड करण्यासाठी फारशी साधने नव्हती तरीही त्यातून तयार झालेली गाणी आजही सुपरहिट आहेत. सध्याचा काळ मात्र रिमेकचा आहे. जुनी गाणी नवीन अंदाजात प्रेक्षकांसमोर सादर केली जातात.

Add Zee News as a Preferred Source

अशाच एका लोकप्रिय गाण्याला आता ‘प्रेमाची गोष्ट 2’मध्ये नव्या रुपात बघायला मिळणार आहे. पिंजरा चित्रपटातील संध्या शांतारामवर चित्रित झालेले ‘दिसला गं बाई दिसला’ हे गाणं मराठी संगीतविश्वातील एक खास गाणं आहे. उषा मंगेशकर यांनी गाण्याला आपल्या आवाजाची खास जादू दिली होती.

'दिसला गं बाई दिसला' गाण्यावर गौतमीचा ठेका

‘प्रेमाची गोष्ट 2’ मध्ये या गाण्याचा रिमेक सादर करण्यात आला असून नुकतंच ‘दिसला गं बाई दिसला 2.0’  गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या नव्या आवृत्तीमध्ये गौतमी पाटीलने ठेका धरला आहे. गौतमीच्या आणि ललित प्रभाकरच्या जबरदस्त जोडीनं या गाण्याला एक वेगळाच जीवंतपणा मिळाला आहे. तसेच, राधा खुडे, आदर्श शिंदे आणि विश्वजीत जोशी यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. संगीताच्या दृष्टीने हे गाणं राम कदम आणि अविनाश-विश्वजीत यांनी सजवले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी सांगितले, 'हे गाणं तयार करताना आमच्या मनात तरुणाईची चाहूल होती. जुने गाणं नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचे होते. पण त्याचा मूळ सार कायम ठेवायचा होता. गौतमी पाटीलच्या एनर्जीमुळे गाण्याला नवीन जिवंतपणा मिळाला आणि तिचा परफॉर्मन्सच या गाण्याचं मुख्य आकर्षण ठरला असं त्यांनी म्हटलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

प्रेक्षकांची गाण्यावर नाराजी

परंतु संगीतप्रेमींकडून या रिमेकवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, 'काय वाट लावताय.. एवढे सुंदर गाणे आणि त्याला असा बदल का केला? तर दुसऱ्याने लिहिले, हे बघण्यासाठी साडेतीनशे-चारशे रुपये खर्च करून मराठी माणूस थिएटरमध्ये येईल का? असं म्हटलं आहे. 

 काहींनी ललित प्रभाकरच्या कामाचे कौतुक करताच प्रश्न उपस्थित केले, 'अरे यार, ललित प्रभाकर काय करताय? किती छान काम केले पण आता काय चालले आहे? काही प्रेक्षक म्हणाले की 'पिंजरा' मधील हे क्लासिक गाणं संध्या शांताराम यांच्या नृत्याभिनयामुळे अजरामर झाले आहे आणि नवीन पिढीला मूळ ओळख न दाखवता केवळ धिंगाणा दाखवले तर ते स्वीकारता येणार नाही असं काहींनी म्हटलं आहे. 

FAQ

‘दिसला गं बाई दिसला’ हे मूळ गाणं कोणत्या चित्रपटाचं आहे आणि त्याची खासियत काय?

हे गाणं १९७२ च्या ‘पिंजरा’ चित्रपटाचं आहे, ज्यात संध्या शांताराम यांनी नृत्याभिनय केला होता. उषा मंगेशकर यांनी गायलं असून, जगदीश खेबुडकर यांचे शब्द आणि त्र्यंबक मॉडक यांचं संगीत आहे. हे मराठी सिनेसृष्टीतील क्लासिक गाणं आहे, जे आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.

‘प्रेमाची गोष्ट २’मध्ये या गाण्याचा रिमेक कसा आहे?

‘दिसला गं बाई दिसला २.०’ हे रिमेक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज झालं. गौतमी पाटील यांनी ठेका धरला असून, ललित प्रभाकर यांच्यासोबत जोडीदार आहेत. गायन: राधा खुडे, आदर्श शिंदे आणि विश्वजीत जोशी. संगीत: राम कदम आणि अविनाश-विश्वजीत. हे गाणं जुन्या व्हायबला नव्या स्वॅगसह सादर केलं गेलं आहे.

चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’बद्दल काय माहिती?

हा रोमँटिक ड्रामा २१ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळीला रिलीज होणार आहे. दिग्दर्शक: सतीश राजवाडे. मुख्य कलाकार: ललित प्रभाकर, रुचा वैद्य, रिद्धिमा पंडित, स्वप्नील जोशी, भाऊ कदम. चित्रपट प्रेमाच्या बदलत्या रूपावर आधारित आहे, ज्यात हास्य, भावना आणि संगीत आहे. ट्रेलर ६ ऑक्टोबरला रिलीज झालं.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More