ड्रग्ज कनेक्शन । रिया चक्रवर्ती हिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

ड्रग्ज रॅकेट प्रकरणात रिया चक्रवर्ती हिच्या न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.  

Updated: Sep 22, 2020, 04:15 PM IST
ड्रग्ज कनेक्शन । रिया चक्रवर्ती हिच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
छाया सौजन्य : इंस्टाग्राम

मुंबई : ड्रग्ज रॅकेट प्रकरणात रिया चक्रवर्ती हिच्या (Rhea Chakraborty) न्यायालयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रियाची  न्यायालयीन कोठडी आज संपली. तिला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणाच्या चौकशी दरम्यान ड्रग्ज सिंडीकेट प्रकरणात एनसीबीने तिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. रिया आणि शौविकने आज हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी  होणार आहे. 

दरम्यान, बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीच्या संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. दीपिका पदुकोणची मॅनेजर करिष्मा प्रकाशची आज एनसीबी चौकशी करणार आहे. करिष्मा प्रकाश आणि दीपिका पदुकोण यांच्यातल्या व्हॉट्सअप चॅटवरून दीपिका अडचणीत येण्याची शक्यता आहे. 

तर दुसरीकडे सारा, रकुलप्रीत, सीमोन खंबाटा यांना एनसीबीकडून या आठवड्यात चौकशीचा समन्स येण्याची शक्यता आहे. त्यातच आता एनसीबीच्या तपासात आणखी दोन अभिनेत्रींचं नाव समोर येते आहे. नम्रता शिरोडकर एनसीबी रियाची जी चौकशी करत आहे. त्यामध्ये समोर आलेली ही दोन नवी नावं रिया, सारा, रकुल, सिमोन पाठोपाठ आता श्रद्धा कपूर आणि नम्रता शिरोडकर. सुशांतची टॅलेंट मॅनेजर जया शाहचे श्रद्धा कपूर आणि नम्रता शिरोडकर बरोबरचे काही चॅटस समोर आलेत. 

6\