जगाचा निरोप घेतलेल्या `त्या` चाहतीला शाहरुखचा भावनिक संदेश!
शाहरुख खानची सर्वात मोठी फॅन अरुणा गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होती.
नवी दिल्ली : शाहरुख खानची सर्वात मोठी फॅन अरुणा गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी झुंज देत होती. शाहरुख खानला भेटण्याची त्यांची शेवटची इच्छा होती. मात्र ती देखील अपूर्णच राहिली. कॅन्सरशी झुंज देणाऱ्या अरुणा यांची मालज्योत मंगळवारी मालवली. कॅन्सरशी लढताना देखील त्या नेहमी हसत असायच्या आणि हसतमुख अशी ओळख त्यांनी सोशल मीडियावर मिळवली होती.
शाहरुखला त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्याने त्याच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केले.
अरुणा या शाहरुखच्या मोठ्या फॅन्स आहेत हे तेव्हा कळले जेव्हा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर अनेक लोकांनी शेअर करून तो शाहरुखपर्यंत पोहचवला. त्यानंतर अरुणा यांचा एक व्हिडीओ समोर आला. ज्यात त्या म्हणाल्या होत्या, मी लवकरच ठीक होऊन शाहरुखची भेट घेईन. मात्र भेटीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.