Farah Khan On Bollywood Affairs: बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने अनेक सुपरहिट चित्रपटांना कोरिओग्राफी दिली आहे. पण एक काळ असा आला, जेव्हा तिने अभिनयात हात आजमावण्याचा निर्णय घेतला. तिने ‘शिरीन फरहाद की तो निकल पड़ी’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. या चित्रपटात तिने ‘शिरीन फुगावाला’ ही भूमिका साकारली होती.
अलीकडेच ट्विंकल खन्ना आणि काजोल यांच्या ‘टू मच’ या शोमध्ये हजेरी लावत फराह खानने तिच्या अभिनयाच्या अनुभवाबद्दल मनमोकळेपणाने बोलताना मोठा खुलासा केला.
फराह खानने सांगितले की, 'खरं सांगायचं तर मला आजही समजत नाही की मी हा चित्रपट का केला? कदाचित मी मोकळी होते आणि बोमन ईरानीने मला फोन केला. त्यानंतर संजय लीला भन्साळी माझ्या घरी आले आणि म्हणाले ‘मी रोज सेटवर राहीन’. बोमनसोबत काम करणं मजेशीर होतं पण अभिनय मला अजिबात भावलं नाही. मी अभिनेत्री झाले आणि त्याच दिवशी ठरवलं हा व्यवसाय माझ्यासाठी नाही. अभिनयामध्ये फक्त वाट बघावी लागते! मला ते अजिबात आवडलं नाही. मग समजलं, लोक सेटवर अफेअर का करतात.
फराह खानने या चर्चेत हसत हसत सांगितलं, मी बोमनला म्हटलं आता समजलं लोक सेटवर अफेअर का करतात, कदाचित कंटाळा घालवण्यासाठी! त्यांच्या या मजेशीर विधानावर शोमधील सगळेच कलाकार हसू लागले.
‘टू मच’ या शोमध्ये बॉलिवूडमधील अफेअर्स, रिलेशनशिप्स आणि वैयक्तिक अनुभवांवर नेहमीच मोकळेपणाने चर्चा होते. या एपिसोडमध्ये ट्विंकल खन्ना, काजोल, फराह खान आणि अनन्या पांडे यांनी एक मनोरंजक प्रश्नावर आपली मतं मांडली.
'मोठ्या वयाचे लोक आपल्या अफेअर्सना लहानांपेक्षा जास्त चांगलं लपवू शकतात का?' यावर ट्विंकल, फराह आणि अनन्या यांनी होय असं उत्तर दिलं. तर काजोलने असहमती दर्शवली. 'मोठे लोक हे अनुभवी असतात…' ट्विंकलने मजेशीर पद्धतीने म्हटलं, कारण त्यांना लपवण्याचा सराव असते.' तर काजोलच्या मते आजच्या पिढीतील तरुण आपले अफेअर्स जास्त चांगल्या प्रकारे लपवतात. तर अनन्या पांडे म्हणाली, आज सोशल मीडियाच्या युगात काहीही प्रायव्हेट राहत नाही. सर्व काही बाहेर येतंच.
FAQ
फराह खानने ‘शिरीन फरहाद की तो निकल पड़ी’ चित्रपटाबाबत काय खुलासा केला?
फराह खानने ‘टू मच’ शोमध्ये सांगितलं की, तिला आजही समजत नाही की तिने हा चित्रपट का केला. बोमन ईरानीने फोन केला आणि संजय लीला भन्साळी घरी येऊन ‘मी रोज सेटवर राहीन’ असं म्हणाले, म्हणून ती तयार झाली. बोमनसोबत काम मजेशीर होतं, पण अभिनय तिला भावला नाही.
फराह खानला अभिनय का आवडला नाही?
फराह खानने सांगितलं की, अभिनयात फक्त वाट बघावी लागते, जे तिला अजिबात आवडलं नाही. अभिनय करून पहिल्या दिवशीच तिने ठरवलं की हा व्यवसाय तिच्यासाठी नाही. तिने बोमनला म्हटलं की, आता समजलं लोक सेटवर अफेअर का करतात, कदाचित कंटाळा घालवण्यासाठी!
‘टू मच’ शोमध्ये अफेअर्सबाबत फराह खानने काय मजेशीर विधान केलं?
फराह खानने हसत हसत सांगितलं की, मी बोमनला म्हटलं आता समजलं लोक सेटवर अफेअर का करतात, कदाचित मार खायला किंवा कंटाळा घालवण्यासाठी! या विधानावर शोमधील सगळेच हसू लागले.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.