CineCrime: चित्रपट हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असतात. पण कधीकधी त्या चित्रपटातील कथेचा आपल्या जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 1981 मधील असाच एक चित्रपट ज्याच्या क्लायमॅक्स प्रेमी युगुलांना अवस्थ करायचा. एवढंच नाही तर अनेक जोडप्याने धक्कादायक पाऊल म्हणजे जीवन संपवले होते.
आम्ही बोलत आहोत, 1981 मधील कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांच्या 'एक दुजे के लिए' या चित्रपटाबद्दल. हा रती आणि कमल यांचा एकत्र पहिलाच हिंदी चित्रपट होता. त्यांच्या पडद्यावरच्या जोडीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावेळी, प्रेक्षक एका प्रेमकथेचे साक्षीदार होणार होते ज्यामध्ये दोन्ही मुख्य भूमिका अखेर मरतात. निर्मात्यांवर चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्याचा दबाव आला होता. चित्रपट पाहिल्यानंतर, राज कपूर यांनी दिग्दर्शक के. बालचंद्र यांना शेवट बदलण्यास सांगितला होता. पण, दिग्दर्शकाला कथा जशी आहे तशीच प्रदर्शित करायची होती.
"एक दुजे के लिए" हा बालचंदर यांच्या तेलुगू चित्रपट "मारो चरित्र" चा हिंदी रिमेक होता. हा चित्रपट आंतरसांस्कृतिक प्रेमाची कहाणी होता, ज्याचा शेवट दुःखद होता. त्यांच्या प्रेमात अयशस्वी होऊन, नायक आणि नायिका आत्महत्या करतात. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले. संगीत प्रचंड हिट झाले. पण हा शेवट त्या काळातील प्रेमींच्या मनावर खोलवर कोरला गेला. चित्रपटातील मुख्य पात्र वासू आणि सपना सारख्या त्या काळातील जोडप्यांनी कड्यावरून उडी मारून आत्महत्या करण्यास सुरुवात केल्याच्या बातम्या येत होत्या.

असं म्हटलं जातं की 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट केवळ हिट झाला नाही तर कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांना रातोरात स्टार बनवले.
या चित्रपटाशी संबंधित इतरही अनेक कथा आहेत. असं म्हटलं जातं की या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता जितेंद्रने दक्षिण भारतीय अभिनेता कमल हासनचा अभिनय आणि नृत्य पाहिलं. जितेंद्र हासन यांच्या अभिनयावर इतका प्रभावित झाला की त्याने त्याच्या चित्रपटाच्या सेटवर जाहीर केलं की दक्षिणेतील एक मुलगा चांगला नाचतो. तो लवकरच बॉम्बे नायकांची जागा घेईल. जितेंद्रच्या कंपनीने कमल हासनच्या या चित्रपटाचे वितरण केलं होतंय.
देशभरातील अनेक जोडप्यांनी आत्महत्या केल्या, त्यानंतर हे घडू नये म्हणून निर्मात्यांना चित्रपटात काही बदल करण्याचे आदेश देण्यात आले. दिग्दर्शक बालचंदर यांनी नंतर क्लायमॅक्समध्ये बदल केला, पण प्रेक्षकांना ते पटले नाही. त्यांना मूळ क्लायमॅक्स पहायचा होता आणि तसेच झाले. चित्रपटाला तीन फिल्मफेअर पुरस्कार आणि एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.