राज कुंद्राप्रमाणे शिल्पा शेट्टी 'या' कारणामुळे होती मोठ्या वादात

शिल्पा शेट्टी वादात अडकल्याचं हे पहिलं प्रकरण नाही.याआधी अनेकदा तिच्या खाजगी आणि प्रोफेशन आयुष्यत घडलेल्या काही गोष्टींमुळे वादात सापडली आहे. 

Updated: Jul 28, 2021, 10:57 PM IST
 राज कुंद्राप्रमाणे शिल्पा शेट्टी 'या' कारणामुळे होती मोठ्या वादात

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काही दिवसांपासून पती राज कुंद्राच्या अटकेमुळे चर्चेत आहे. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रावर केवळ अश्लील चित्रपटांच्या व्यवसायात पैसे गुंतवल्याचा आरोपच नव्हे, तर त्यामधून मोठ्या प्रमाणात नफा कमावल्याचं ही बोललं जात आहे.या संपूर्ण प्रकरणात शिल्पावरही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. कारण ती राज कुंद्राची बिझिनेस पार्टनर देखील आहे

शिल्पा शेट्टी वादात अडकल्याचं हे पहिलं प्रकरण नाही.याआधी अनेकदा तिच्या खाजगी आणि प्रोफेशन आयुष्यत घडलेल्या काही गोष्टींमुळे वादात सापडली आहे. अनेक प्रकरणात  अभिनेत्रीच्या नावाची  चर्चा झाली आहे.

रिचर्ड गेरे वाद 
2007 साली घडलेल्या या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होतं आणि त्यावरून बरीच खळबळ उडाली होती. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेरे एड्सच्या जनजागृती संबंधित  इव्हेंटसाठी भारतात आला आणि एका कार्यक्रमादरम्यान त्याने शिल्पाला सगळ्यांसमोर किस केलं होतं. शिल्पाच्या म्हणण्यानुसार तिला त्यावेळी सावरण्याची संधीही मिळाली नाही.

बिग ब्रदरवरील वाद 
अभिनेत्री शिल्पा शेट्टीसुद्धा बिग ब्रदर टीव्ही रियलिटी शोमध्ये गेस्ट म्हणून दिसली होती. या शो दरम्यान स्पर्धक जेड गुडीने शिल्पाबद्दल वर्णद्वेषी टिप्पणी केली. यामुळे बरीच खळबळ उडाली होती.  दरम्यान या घटनेनंतर जेड यांना शिल्पाची माफी मागावी लागली होती.

पुजाऱ्यामुळे शिल्पा चर्चेत 
2009 मध्ये शिल्पा शेट्टी ओडिसाच्या साक्षीगोपाल मंदिरात पोहोचली होती. इथे एका पुजार्‍याने त्याला गालावर चुंबन घेतले होते. या प्रकरणामुळे बराच वाद निर्माण झाला होता, त्यानंतर शिल्पा म्हणाली की पुजारी तिच्या वडिलांप्रमाणे आहे. ज्या चर्चा रंगल्या होत्या त्यावर शिल्पाने सडेतोड उत्तर देखील दिलं होतं.