)
Shoaib Malik : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. रिपोर्टनुसार, शोएब मलिक आणि त्याची तिसरी पत्नी सना जावेद यांचे नातेही तुटण्याच्या मार्गावर आहे. शोएब मलिक आणि सना यांनी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कराची येथे खासगी सोहळ्यात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती आणि त्यांना अनेक शुभेच्छा देखील मिळाल्या होत्या. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की, दोघांचा मार्ग वेगळा होऊ लागला आहे आणि दोघेही घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहेत.
शोएब मलिकने यापूर्वी आपली दुसरी पत्नी भारताची माजी स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासोबत तलाक घेतला आहे. त्यानंतर लगेचच शोएबने तिसरे लग्न केले. ते देखील आता संपण्याच्या टप्प्यावर आहे.
जानेवारी 2024 मध्ये शोएब मलिक आणि सना जावेद यांनी एका खासगी समारंभात लग्न केले होते. लग्नापूर्वी दोघे डेटिंगमध्ये होते आणि त्यांच्या नात्याबाबत चर्चाही होती. पण अलीकडील एका कार्यक्रमामध्ये दोघे वेगवेगळ्या दिशांनी दिसल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
कार्यक्रमामध्ये शोएब मलिक ऑटोग्राफ देताना दिसला तर सना जावेद दुसऱ्या दिशेला होती. दोघांमध्ये जवळीक किंवा संभाषण न झाल्यामुळे या जोडीच्या तुटण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
शोएब मलिकने 2002 मध्ये पहिल्यांदा आयशा सिद्दीकी हिच्याशी लग्न केले होते. जे 2010 मध्ये तुटले. त्यानंतर लगेचच 2010 मध्ये शोएब सानिया मिर्झा यांच्याशी लग्न केले. जो भारतात चर्चेचा विषय बनला होता. शोएब आणि सानिया यांचे नातेसंबंध 13 वर्षे टिकले,पण 2023 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.
सानियापासून तलाकानंतर लगेचच 2024 मध्ये सना जावेद शोएबच्या आयुष्यात आली आणि जानेवारी 2024 मध्ये दोघांचे लग्न झाले. मात्र, या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच झालेले हे लग्न संपण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शोएब मलिकच्या वैयक्तिक आयुष्यातील हा टप्पा त्याच्या चाहत्यांसाठी मोठा आश्चर्याचा विषय ठरत आहे आणि दोघांचाही पुढील निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
FAQ
शोएब मलिक आणि सना जावेद यांचे लग्न कधी झाले?
शोएब मलिक आणि सना जावेद यांचे लग्न जानेवारी २०२४ मध्ये कराची येथे खासगी सोहळ्यात झाले. लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.
घटस्फोटाच्या चर्चा कशामुळे सुरू झाल्या?
अलीकडील एका कार्यक्रमात शोएब मलिक आणि सना जावेद वेगवेगळ्या दिशांना दिसले. दोघांमध्ये जवळीक किंवा संभाषण नसल्याने घटस्फोटाच्या अफवा जोर धरू लागल्या.
शोएब मलिकचे पहिले लग्न कोणाशी झाले?
शोएब मलिकने २००२ मध्ये आयशा सिद्दीकी हिच्याशी पहिले लग्न केले, जे २०१० मध्ये तुटले. आयशाने सोशल मीडियावर लग्नाच्या फोटो शेअर करून टीका केली होती.