Ashish Ubale : लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आशिष अरुण उबाळे यांनी नागपुरमधील रामकृष्ण मठात गळफास घेत आत्महत्या केली. आशिष हे 58 वर्षांचे होते आणि त्यांनी काल 17 मे शनिवारी संध्याकाळी त्यांनी नागपुरमध्ये आत्महत्या केली. कर्जामुळे आशिष उबाळे यांनी आत्महत्या केल्याची सध्या बातमी समोर आहे. मात्र, त्यांनी इतकं मोठं पाऊल का उचललं याविषयीचं सत्य अजून समोर आलेलं नाही. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.
आशिष हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक तणावात असल्याचं म्हटलं जातं आहे. शुक्रवारी संध्याकाळी ते त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे जे रामकृष्ण मठामध्ये सेवेकरी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना भेटण्यासाठी नागपुरला गेले. आशिष उबाळे हे मुळचे नागपूर येथील महाल भागातील आहे. तर मुंबईतील ते चुनाभट्टी परिसरात राहत होते. मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाची नेहमीच चर्चा व्हायची.
दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, आशिष हे रामकृष्ण मठात गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामाला होते. त्यांनी सकाळी मठात जेवणं केलं आणि नंतर थोडा आराम करण्यासाठी ते रुममध्ये गेले. त्यानंतर ते रूममधून बाहेर आलेच नाही. इतकावेळ भाऊ बाहेर आला नाही हे पाहता आशिष यांचे धाकडे भाऊ सारंग हे त्यांना उठवण्यासाठी त्यांच्या रुममध्ये गेले तर त्यांनी रूम उघडला नाही. इतकंच नाही तर अनेकदा आवाज दिल्यानंतरही काही उत्तर मिळालं नाही हे पाहता मठ प्रशासनानं पोलिसांना माहिती दिली.
आशिष उबाळे यांनी एफटीआय येथून दिग्दर्शक म्हणून डिग्री घेतली. त्यानंतर ते सिनेसृष्टीत आपले नशिब आजमावण्यासाठी मुंबईत आले. पोलिस घटनास्थळी पोहोचले असताना त्यांनी दरवाजा उघडून पाहिलं तर आशिष उबाळे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलिसांनी लगेच तिथे पंचनामा केले. तर त्यात अशी माहिती समोर आली की आशिष उबाळे यांनी स्वत: ला व्हॉट्सअपवर एक नोट पाठवली होती. त्यात त्यांनी कर्जाच्या ओझ्यापायी त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यातून समोर आले आहेत.
आशिष उबाळे यांच्या करिअरविषयी बोलायचं झालं तर टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी बरीच वर्ष काम केलं. त्यांनी 'अग्नी', 'एका श्वासावे अंतर', 'गजरा' आणि 'चक्रव्यूह' सारख्या मराठी मालिकांचे दिग्दर्शन केले. त्याशिवाय त्यांनी ‘गार्गी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली. याशिवाय त्यांनी ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ आणि ‘बाबुरावला पकडा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तर त्यांचा ‘गार्गी’ हा चित्रपट 2009 मध्ये नागपुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्लस्बर्ग आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.