)
Aamir Khan Gauri Spratt wedding : बॅालीवूडचा स्टार अभिनेता आमिर खानने 5 जुलै रोजी तिसरे लग्न केले, मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी एका खाजगी समारंभात त्याची दीर्घकाळाची जोडीदार गौरी स्प्रॅटशी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत, मागील वर्षी आमिर खानने त्याची गर्लफ्रेंड गौरी अधिकृतपणे मिडियावर ओळख करुन दिली होती. आजच्या त्याच्या विवाहसोहळ्याला जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. राज ठाकरे त्याचबरोबर भारतीय संघातील माजी खेळाडू इरफान पठाण देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. लग्नानंतर जोडप्याचे काही सुंदर फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोडप्याने दुपारी 12:45 च्या सुमारास आमिरच्या घरी विवाह नोंदणी पूर्ण केली.
आमिर खानच्या दोन्ही माजी पत्नी त्याचबरोबर त्याची मुले देखील या विवाहसोहळ्याला उपस्थित होती. पाहुण्यांच्या यादीबद्दल सांगायचे झाले तर आमिर खानची मुलगी इरा खान आणि त्याचा मोठा मुलगा जुनैद खान हे समारंभात सहभागी झाले होते. त्याचबरोबर इरा खानचा पती आणि आमिर खानचा जावई नुपूर शिखरे, चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर एवढेच नाही तर अंबानी कुटुंबातील काही सदस्य देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. अभिनेत्री एली अवराम, क्रिकेटपटू इरफान पठाण, राजकारणी राज ठाकरे आणि काही जवळचे मित्र व नातेवाईक यांचा समावेश होता. आता गौरीने आमिर खानशी लग्न केल्यानंतर आता तिने धर्मांतर केले की नाही याबद्दल सोशल मिडियावर चर्चा पाहायला मिळाली आहे.
आमिर खान आणि गौरी यांचे आता लग्न झाले आहे आणि आता गौरीने इस्लाम धर्म स्विकारला का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण आता आमिर खानसोबत गौरीने लग्न करण्याआधी गौरी स्प्रॅटने इस्लाम धर्म स्वीकारला होता का? हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत. धर्मांतराबाबत आमिर खान आणि गौरीने कोणतेही अधिकृत विधान केलेली नाही, त्यामुळे हे अजूनपर्यत अस्पष्ट आहे. हे नोंदणीकृत लग्न असल्याने, दुसऱ्या जोडीदाराने धर्मांतर करण्याची अशी कोणतीही आवश्यकता नसते.
आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत झाले होते, ज्यांच्यासोबत त्याला इरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत. नंतर, 2005 मध्ये आमिरने चित्रपट निर्माती किरण रावशी लग्न केले. मात्र, 2011 मध्ये हे लग्न संपुष्टात आले. त्याला किरण रावसोबत आझाद नावाचा एक मुलगा आहे. मात्र, आता आमिर खानने 5 जुलै 2026 रोजी गौरी स्प्रॅटसोबत तिसऱ्यांदा लग्न केले आहे.