जिनिलिया बसण्याआधीच ड्रायव्हरनं कार चालू केली अन्...; अपघात टळला नाहीतर...

Genelia Deshmukh Viral Video : जिनिलिया देशमुख कारमध्ये बसायला जाणार अन् ड्रायव्हरनं कार केली चालू... पुढे काय झालं पाहा.

दिक्षा पाटील | Updated: May 24, 2025, 02:05 PM IST
जिनिलिया बसण्याआधीच ड्रायव्हरनं कार चालू केली अन्...; अपघात टळला नाहीतर...
(Photo Credit : Social Media)

Genelia Deshmukh Viral Video : बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसूजा ही लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सध्या जिनिलियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण तिचा हा व्हिडीओ तिचा नवरा आणि अभिनेता रितेश देशमुखसोबत असलेला रील व्हिडीओ नाही. तर तिचा हा व्हिडीओ मुलांसोबत ती बाहेर गेलेली असताना ती स्पॉट झाली तेव्हाचा आहे. गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असताना ड्रायव्हरनं चुकून गाडी पुढे घेतली. तर तितक्यात काही झालं असतं तर अशी चिंता तिच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. 

जिनिलिया तिच्या मुलांसोबत स्पॉट झाली. त्याचा व्हिडीओत सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सगळ्यात आधी जिनिलिया ही पापाराझींना पोज देताना दिसते तर त्यानंतर जिनिलिया ही गाडीत बसायला जाते. तर न कळत ड्रायव्हर हा गाडी पुढे घेतो. त्यावेळी कारचा दरवाजा हा उघडाच असतो. अशात जिनिलियानं स्वत: ला सावरलं आणि तिनं ड्रायव्हरला लगेच सांगितलं. त्यामुळे ती बचावली तिचा काही अपघात झाला नाही. तिला काही इजा झाली नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकदा सेलिब्रिटी हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही गोष्टींवर अगदी छोट्या गोष्टीसाठी ओरडतान दिसतात. पण आता जिनिलियानं मात्र, त्यावर जास्त रिअ‍ॅक्ट न करता शांतपणे ड्रायव्हरला थांबवण्यास सांगितलं. जिनिलियानं केलेल्या या कृत्याची सगळीकडे  कौतूक होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

हेही वाचा : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; वयाच्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दरम्यान, काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवरून पापाराझींनाच ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, 'अरे ही गाडी तर फूल स्पीडमध्ये होती.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अरे बापरे ही तर खूप मोठी बातमी दिली तुम्ही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'होतं कधी कधी असं.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'काही नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'कुठे इतकी जोरात गाडी होती. वाचायला.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अरे कोणी अॅमब्युलन्सला बोलवा.'