मुंबई : ईटालियन सुपरमॉडेल बनलेली बॉलिवूड अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीने तिच्या अभिनयाने आणि फॅशनसेन्सने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. जॉर्जियाने आता चाहत्यांमध्ये एक विशेष ओळख निर्माण केली आहे. विशेषतः तिच्या आश्चर्यकारक डान्स स्टेप्स, परिपूर्ण फिगर आणि फॅशनसेन्ससाठी ओळखली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय जॉर्जियाला नवं-नवीन भाषा शिकायला आवडतात. जॉर्जिया अँड्रियानी भारतात आली आणि खूप कमी वेळात हिंदी आणि पंजाबी अस्खलितपणे बोलण्यास शिकली. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये मराठी बोलून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे.



जॉर्जियाची पोस्ट
अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप सक्रिय असते आणि तिचे व्हिडिओ सर्वांना आवडतात देखील. आपल्या सर्वांना माहित आहे की जॉर्जिया अँड्रियानी इटालियन आहे, मात्र अभिनेत्रीला नवीन गोष्टी शिकायला आवडतात तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या खास मित्राने तिला विचारले, “तू मराठीत बोलू शकतेस का? मी तुझी परीक्षा घेवु शकतो का? " उत्तर देताना अभिनेत्रीने तिच्या व्हिडिओमध्ये मराठीत हसत म्हटलं,"माझी परीक्षा का घेशील, मी आगोदरज पास झाली आहे!" 


जॉर्जिया अँड्रियानीच्या चाहत्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये तिच्यावर भरभरुन प्रेमाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीचा मराठी उच्चार ऐकून चाहते देखील स्तब्ध झाले आहेत. याशिवाय, जॉर्जियाची डान्ल स्टेप आणि तिची फिटनेसची आवड प्रशंसनीय आहे.


वर्क फ्रंटवर बोलायचं झालं तर, जॉर्जिया अँड्रियानीने दक्षिणेतील "कॅरोलिन आणि कामाक्षी" वेब सिरीसमधून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. अभिनेत्री जियोर्जिया अँड्रियानी तिच्या म्युझिक अल्बममध्ये मिका सिंगसोबत सदाबहार गाणे "रूप तेरा मस्ताना"चं रीमिक्स करताना दिसली ज्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं, ती लवकरच श्रेयस तळपदेसोबत "वेलकम टू बजरंगपूर" चित्रपटात काम दिसणार आहे. जॉर्जिया अँड्रियानीकडे आणखी रोमांचक आगामी प्रोजेक्ट आहेत जे ती लवकरच घोषित करेल..