'... मला याची भीती वाटते', नॅशनल क्रश झालेली गिरीजा ओक असं का म्हणतेय, 'माझा मुलगा आणि नवरा...'

मराठमोठी अभिनेत्री गिरीजा ओक नॅशनल क्रश बनली आहे. असं असताना तिला नेमकी कशाची भीती वाटतेय? हे तिने आपल्या एका व्हिडीओत सांगितलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 13, 2025, 11:08 PM IST
'... मला याची भीती वाटते', नॅशनल क्रश झालेली गिरीजा ओक असं का म्हणतेय, 'माझा मुलगा आणि नवरा...'

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने आपण कसे काही दिवसातच 'नॅशनल क्रश' झाल्यावर आश्चर्य व्यक्त केला आहे. गिरीजासाठी हा सगळा अनुभव अतिशय वेगळा आणि छान आहेत. तसेच तिने यासोबतच काही क्रिएटिव्ह पोस्टचा देखील उल्लेख केला आहे. ज्या अतिशय युनिक आणि मजेशीर आहेत. मात्र AI चा वापर करुन अश्लील फोटो देखील केल्याचं गिरीजाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अशाप्रकारचे फोटो सोशल मीडियावर टाकले जातात. मी देखील याच काळातील आहेत, त्यामुळे अशा पद्धतीच्या पोस्टची खरंच गरज आहे का? असा पद्धतीचा सवाल गिरीजाने विचारला आहे. कारण गिरीजा म्हणते की, ही सगळी एक चैन आहे. लोकप्रियता आणि मग पैसा या सगळ्यासाठी हा खेळ सुरु होतो. पण.... 

पण मला या सगळ्याची भीती वाटते 

गिरीजा ओक सांगते की, मला या सगळ्याची भीती वाटते. माझा एक 12 वर्षांचा मुलगा आहे. जो आज सोशल मीडियावर नाही. पण आज ना उद्या तो या पद्धतीच्या पोस्ट आणि फोटो पाहिल. त्याने जर असा फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल? हा विचार मला छान वाटत नाही. 

काहीच न करणे... 

गिरीजा ओक या व्हिडीओत म्हणते की, मला माहित आहे या सगळ्यावर माझा कंट्रोल नाही. मी काहीच करु शकत नाही. पण जर तुम्ही असे फोटो क्रिएट करत असाल किंवा त्याचा भाग असाल तर कृपया हे करु नका. एवढंच नाही तर तुम्ही ते पाहून लाईक करत असाल तर थांबा. 

पण या निमित्ताने ...

गिरीजा ओक या सगळ्या प्रकाराकडे सकारात्मकपणे पाहत आहे. गिरीजा म्हणते की, या प्रकारामुळे जर लोकं माझे सिनेमे पाहत असतील, मला ओळखत असतील किंवा माझी नाटकं पाहणार असतील तर ही गोष्ट नक्कीच चांगली आहे. या निमित्ताने माझ्या कामाची चर्चा होत आहे.  

मीम्सना दिलं उत्तर

गिरिजा म्हणते, "कोणीतरी मला एक पोस्ट पाठवली ज्यामध्ये वादविवाद झाला होता की ती (अभिनेत्री) प्रिया बापट आहे की मी! मग माझ्या मेहुण्याने मला सांगितले की काही नीच हँडलने माझे फोटो काढले आहेत आणि संपूर्ण 'भाभी प्रेमी' सीन प्ले करत आहेत. काही पेजनी मला कामुक केले आहे. पण मराठी चाहते म्हणाले, 'तुम्ही तिला नुकतेच शोधून काढले!' आम्ही तिला वर्षानुवर्षे ओळखतो."

जेव्हा एक्सबद्दल मीम्सचा पूर सुरू झाला, तेव्हा गिरीजाने ते सहजतेने घेतले. ती म्हणाली, "मी जे काम करते ते इथेच राहील. जर लोकांना आता माझे काम सापडले तर मी आनंदी आहे." अशा प्रकारच्या कंटेंटच्या प्रवाहा असूनही, ती म्हणते की तिच्या कुटुंबाला त्याचा त्रास झाला नाही.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More